एम जे अकबर यांचं पत्रकारिता क्षेत्रात मोठं नाव आहे. त्यांचं नाव, सन्मान आणि कार्यामुळे त्यांना परराष्ट्र राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी शोषणाचे आरोप केल्याने आता माध्यम आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
प्रिया रमानी यांनी आरोप करताना अनेक ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी केवळ आपलं दु:ख सांगितलं नाही तर पूर्ण कहाणीच दिली आहे.
प्रिया रमानी यांनी भली मोठी पोस्ट लिहिली आहे. त्या म्हणतात “या पोस्टमध्ये एम जे अकबर यांच्यासोबतची माझी कहाणी आहे. कधीही त्यांचं नाव घेतलं नाही, कारण त्यांनी ‘काही’ केलं नव्हतं. अनेक महिलांकडे या शिकाऱ्याच्या असंख्य घृणास्पद कहाण्या आहेत. त्या आता पुढे येतील अशी आशा आहे”
#MeeToo : काय, कधी, कुठे, का आणि कुणाकडून सुरुवात? वाचा सर्व काही
आपल्या पोस्टमध्ये पुढे प्रिया म्हणतात, एक युवा पत्रकार म्हणून आम्ही एम जे अकबर यांना सन्मानपूर्वक पाहात होतो. अकबर यांच्यासोबत काम करणं म्हणजे एक स्वप्न होतं.
अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वादानंतर #MeToo ही मोहिम पुन्हा चर्चेत आली. आता दिग्दर्शक विकास बहलवर एका महिलेच्या लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर या मोहिमेने आणखी जोर पकडला आहे. त्यात आता प्रिया रमानी यांनी केलेल्या आरोपांची भर पडली आहे.
प्रिया रमानी यांनी लिहिलेल्या पोस्टचं हिंदी भाषांतर
ये तथ्य एम जे अकबर के बारे में लिखने से शुरू कर रही हूं. उनके बारे में बहुत सारी महिलाओं के बुरे अनुभव हैं. उम्मीद हैं वो भी इसे साझा करेंगी. आपने मुझे करियर में पहला पाठ पढ़ाया. मैं 23 की थी और आप 43 के. आप को पढ़ते हुए मैं बड़ी हुई थी, प्रोफेशनली आप मेरे हीरो थे. सभी लोग कहते थे आपने देश की पत्रकारिता को बदल दिया है, इसलिए मैं आपकी टीम का हिस्सा बनना चाहती थी. आपने मुझे इंटरव्यू के लिए साउथ मुंबई के एक होटल में बुलाया. शाम के 7 बज रहे थे. होटल की लॉबी में पहुंचकर मैंने आपको फोन किया, आपने कहा आ जाओ. रूम में पहुंची तो वहां डेटिंग जैसा माहौल ज्यादा था, इंटरव्यू का कम. आपने अपने मिनी बार से मुझे ड्रिंक ऑफर किया, मैंने मना कर दिया. आपने वोदका ली, एक छोटे टेबल पर मैं और आप इंटरव्यू के लिए आमने-सामने थे. वहां से मुंबई का मरीन ड्राइव जिसे क्वींस नेकलेस कहते हैं, दिख रहा था. आपने कहा कितना रोमांटिक लग रहा है, आपने हिंदी फिल्म का पुराना गाना सुनाया और मुझसे संगीत पर मेरी रुचि के बारे में पूछने लगे. रात बढ़ती जा रही थी, मुझे घबराहट हो रही थी. कमरे में बिस्तर भी था, आपने कहा यहां आ जाओ, यहां बैठ जाओ, मैंने कहा नहीं मैं कुर्सी पर ही ठीक हूं. उस रात मैं किसी तरह बच गई, आपने मुझे काम दे दिया, मैंने कई महीने आपके साथ काम किया, लेकिन तय कर लिया कभी आपसे रूम में अकेले नहीं मिलूंगी. सालों बाद भी आप नहीं बदले . आपके यहां जो भी नई लड़की काम करने आती थी, आप उसपर अपना अधिकार समझते थे. आप उन्हें प्रभावित करने के लिए गंदी-गंदी तरकीबें अपनाते थे. उनसे कहते थे- मेरी तरफ देखो, पूछते थे क्या तुम्हारी शादी हो गई है, कंधा रगड़ते थे. आप भद्दे फोन कॉल और मैसेज करने में एक्सपर्ट हैं. आप जानते हैं कि कैसे चुटकी काटी जाए. थपथपाया जाए, जकड़ा जाए और हमला किया जाए, आपके खिलाफ बोलने की अब भी भारी कीमत चुकानी पड़ती है. ज्यादातर युवा महिलाएं यह कीमत अदा नहीं कर सकतीं.
काय आहे मी टू?
महिलांसोबत घडणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत जगभरात चर्चा सुरु झाली आहे. कधी ना कधी अशाप्रकारच्या प्रसंगांना सामोरं गेलेल्या महिला #MeToo ह्या हॅशटॅगद्वारे त्यांची कहाणी ट्विटरवर शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी #MeToo ट्विटरवर टॉप ट्रेण्डिंगमध्ये होतं. आतापर्यंत सुमारे लाखो महिला या हॅशटॅगशी जोडल्या गेल्या आहेत. काही पुरुषांनीही यावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे. हजारो लोकांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हा हॅशटॅग वापरुन आपली कमेंट लिहिली आहे.
संबंधित बातम्या
#MeeToo : काय, कधी, कुठे, का आणि कुणाकडून सुरुवात? वाचा सर्व काही
सोशल मीडियावर सुरु असलेलं #Metoo अभियान काय आहे?
'संस्कारी' अभिनेते अलोकनाथांवर बलात्काराचा आरोप