Merciless sea monster : लाखो वर्षांपूर्वीचे सागरी जीवन प्रकट करणाऱ्या सागरी प्राण्याचे जीवाश्म वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत. हे जीवाश्म एका महाकाय सागरी सरड्याचे आहेत. हे जीवाश्म दर्शवतात की 66 दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्रावर या नामशेष प्राण्याचे राज्य होते. हा प्राणी मोसासॉरची नवीन प्रजाती आहे. क्रेटासियसच्या उत्तरार्धात या महाकाय सागरी सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती महासागरांमध्ये कायम होती. ते प्राणी अतिशय धोकादायक मानले जातात. या प्राण्याची लांबी सुमारे 30 ते 33 फूट होती
क्रेटेशियस रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, या प्राण्याचे नाव थॅलासोटिटन अॅट्रॉक्स असे आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की थॅलासोटेटन हे नाव ग्रीक शब्द 'थॅलासा' आणि 'टायटन', म्हणजे 'महाकाय सागरी प्राणी'व 'अट्रोक्स' या प्रजातीचे नाव आहे, ज्याचा अर्थ 'क्रूर'असा आहे.
या प्राण्याचे दात आणि उर्वरित शरीराचे अवशेष पाहून हे लक्षात येते की हा प्राणी अतीशय भयानक होता. तो समुद्रात सापडणाऱ्या अवघड शिकारीला लक्ष्य करायचा. जसे की समुद्री कासव, प्लेसिओसॉर आणि इतर मोसासॉर. तर इतर मोसासॉर लहान प्राण्यांची शिकार करायचे. फूड वेबवर थॅलसोटिटन बघितले तर त्याचे स्थान सर्वात वर होते. मोसासौर प्रजातीचा असा कोणताही सरपटणारा प्राणी आज जिवंत नाही. या प्राण्याची लांबी 40 फुटांपर्यंत होती. ही लांबी आजच्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या दुप्पट आहे. त्यांचं डोकं मोठं होतं.
मोसासौर प्रजाती त्यांच्या वेगवेगळ्या दातांनुसार वेगवेगळ्या प्रकारची शिकार करत असत. काही प्राण्यांना लहान आणि तीक्ष्ण दात होते, जे मासे आणि स्क्विडसाठी चांगले होते. काहींना तीक्ष्ण दात नव्हते पण कुरकुरीत जबडे होते, ते कवच असलेल्या प्राण्यांसाठी योग्य होते. संशोधन असे दिसून आले आहे की हा मोसासॉर मासे, सेफॅलोपॉड्स, कासव, मोलस्क, इतर मोसासॉर खात असे. थॅलासोटिटन हा सर्वात भयंकर प्राण्यांपैकी एक असल्याचे मानले जाते.
हे जीवाश्म मोरोक्कोच्या फॉस्फेट फॉसिल बेड्समधून सापडले आहेत. हे क्षेत्र विविध आणि अत्यंत संरक्षित क्रेटासियस आणि मायोसीन जीवाश्मांनी समृद्ध आहे. त्याच्या अवशेषांमध्ये कवटी, कशेरुका, हात आणि पायांची हाडे व बोटांची हाडे समाविष्ट आहेत.
या प्राण्याची लांबी सुमारे 30 ते 33 फूट असावी असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्याची कवटी सुमारे 1.5 मीटर लांब होती. उर्वरित मोसासॉरचे जबडे सडपातळ होते, परंतु थॅलासोटिटनचे जबडे रुंद आणि लहान होते, मोठे तीक्ष्ण दात शिकार पकडण्यासाठी आणि फाडण्यासाठी होते. संशोधकांचा असा विश्वास आहे की, थॅलसोटिटनने कासवांच्या कवचांची किंवा इतर कठीण कवच असलेल्या प्राण्यांची शिकार केली असावी किंवा त्यांच्या दातांनी कडक पृष्ठभाग चावला असेल.
क्रेटासियस कालावधीच्या शेवटच्या 25 दशलक्ष वर्षांमध्ये मोसासॉरमध्ये अनेक बदल झाले. थॅलासोटिटनचा शोध असे सुचवितो की मोसासॉर आपल्या विचारापेक्षा खूप वैविध्यपूर्ण होते. तसेच त्यांची परिसंस्था खूप चांगली होती. 66 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक महाकाय लघुग्रह आदळल्यानंतर डायनासोर नामशेष झाले, त्याच वेळी मोसासॉर देखील नामशेष झाले. नवीन संशोधानुसार लघुग्रहाची टक्कर होण्यापूर्वी महासागर समृद्ध आणि वैविध्यपूर्ण जीवनाने भरलेला होता.