पाकिस्तानात शारीरिक नाही पण मानसिक छळ झाल्याची अभिनंदन यांची माहिती
संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अभिनंदन यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या भेटीत अभिनंदन यांनी दोन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात असतानाचा संपूर्ण तपशील संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.
नवी दिल्ली : विंग कमांडर अभिनंदन वर्थमन पाकिस्तानात दोन दिवस राहिल्यानंतर शुक्रवारी रात्री 9 वाजून 21 मिनिटांनी भारतात परतले. भारतात परतल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानने आपला शारीरिक छळ केलेला नाही मात्र मानसिक छळ केल्याचं अभिनंदन यांनी सांगितलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनंदन यांना एकांतात ठेवण्यात आलं होतं. त्यांना टीव्ही, फोन, वर्तमान पत्र अशा कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नव्हत्या. तसेच त्यांची सुटका होणार असल्याची माहितीही त्यांना देण्यात आली नव्हती.
Sources: After returning from Pakistan, Wing Commander Abhinandan Varthaman has informed that though he was not physically tortured by the Pakistanis; he went through a lot of mental harassment. pic.twitter.com/x7C3lFsrSR
— ANI (@ANI) March 2, 2019
संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अभिनंदन यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या भेटीत अभिनंदन यांनी दोन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात असतानाचा संपूर्ण तपशील संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.
अभिनंदन यांना शुक्रवारी रात्री अटारी-वाघा बॉर्डरवरुन भारताच्या ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर अडीच तासांनंतर वायुसेनेच्या विमानाने त्यांना दिल्लीत आणण्यात आलं. सध्या एअर फोर्स सेंट्रल मेडिकल एस्टॅब्लिशमेंटमध्ये त्यांच्या उपचार सुरु आहेत.
पाकिस्तानी विमानांनी 27 फेब्रुवारीला भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. त्यावेळी अभिनंदन यांनी पाकिस्तानी विमानाचा पाठलाग करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान अभिनंदन यांनी पाकिस्तानचं एफ-16 विमान जमीनदोस्त केलं आणि त्यावेळी त्यांचं विमानही दुर्घटनग्रस्त झालं. विमान कोसळल्याने अभिनंदन पाकिस्तानात पडले आणि तेथून पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतलं होतं.
व्हिडीओ-
संबंधित बातम्या विंग कमांडर अभिनंदन यांना भारतात 'या' खडतर परीक्षांचा सामना करावा लागणार भारताचा ढाण्या वाघ परतला, अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायदेशी भारतीय जवानांच्या अन्नात विष मिसळण्याचा पाकिस्तान आणि आयएसआयचा कट, सीआयडीची माहिती भारताने डिक्शनरीमधला 'अभिनंदन' शब्दाचा अर्थ बदलला : नरेंद्र मोदी