एक्स्प्लोर

90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच संघात बंडाळी, 600 स्वयंसेवकांचा राजीनामा

पणजी : सर्वात शिस्तप्रिय संघटना म्हणून बिरुद मिरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे गोवा प्रांत प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी भाजपविरोधात आवाज उठवला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महाभारत घडलं. गोव्यातील 600 स्वयंसेवकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजीनामा दिला आहे.   सुभाष वेलिंगकर विधानसभा निवडणूक लढवणार   सुभाष वेलिंगकर यांनी गोवा आरएसएस नावाची नवी संघटना स्थापन करत भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. त्याचसोबत, गोव्यातील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणाही वेलिंगकरांनी केली आहे. वयाच्या 13 व्या वर्षी संघाशी जोडलेल्या वेलिंगकरांचं गोव्यातील राजकारणात महत्त्वाचं स्थान आहे. शिवाय, भारतीय भाषा सुरक्षा मंच नावाची संघटनाही वेलिंगकर चालवतात.   संघानं सुभाष वेलिंगकरांची हकालपट्टी केली. भाजपविरोधात बोलल्यामुळे एखाद्या पदाधिकाऱ्याची अशी हकालपट्टी करण्याची ही पहिली घटना आहे. मात्र वेलिंगकरांची हकालपट्टी नाही तर पदमुक्त केल्याचा दावा संघाकडून करण्यात आला आहे.   गेल्या तीन दशकांपासून वेलिंगकर संघाचे निष्ठावान स्वयंसेवक आहेत. गोव्यातील प्रत्येकाला मातृभाषेतून शिक्षण द्यावं यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या वतीनं जनआंदोलन उभारलं. गोव्यात भाजपविरोधात असताना त्याला भाजपचीही साथ होती. पण सत्ता आल्यानंतर भाजपनं घुमजाव केल्याचा आरोप वेलिंगकरांनी केला आहे.   गेल्या काही दिवसात भाजप विरुद्ध भारतीय भाषा सुरक्षा मंचाचा वाद सुरु आहे. पण मंचाच्या कार्यकर्त्यांनी गोव्याच्या दौऱ्यावर आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहांना काळे झेंडे दाखवले. कदाचित संघ नेतृत्वाला ते रुचलं नसावं आणि त्यातून त्यांना पदमुक्त केलं. त्यामुळे गोव्यातील चारशे स्वयंसेवक बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.   देशातली सर्वात मोठी आणि शिस्तप्रिय संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची ओळख आहे. त्यामुळे आजपर्यंत कुठल्याही अंतर्गत मुद्द्यावर संघाचा वाद कधीच चव्हाट्यावर आला नाही किंवा तशी वेळही संघानं येऊ दिली नाही. पण आता वेलिंगकरांची गच्छंती आणि त्यानंतर झालेली बंडाळी पाहता संघाला आपल्या करड्या शिस्तीबद्दल ‘दक्ष’ राहावं लागेल. हे नक्की

महत्त्वाच्या बातम्या

Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Judge Ravi Kumar Diwakar: अवघ्या 5 महिन्यात 23 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश म्हणाले, 'एकवेळ मरेन पत्करेन, पण..'
अवघ्या 5 महिन्यात 23 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश म्हणाले, 'एकवेळ मरेन पत्करेन, पण..'
Vladimir Putin visits India: व्लादिमीर पुतिन ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येणार; 9 महिन्यांत दुसऱ्यांदा दौरा,मोदींसोबत द्विपक्षीय बैठक होणार
व्लादिमीर पुतिन ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येणार; 9 महिन्यांत दुसऱ्यांदा दौरा, मोदींसोबत द्विपक्षीय बैठक होणार

व्हिडीओ

Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha
Sugercane : साखर हंगामासाठी घाई का? Special Report
How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
Raghav Chadha Voter Row : आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
Embed widget