एक्स्प्लोर

Pulwama terror attack : पत्नीला दोन महिन्यात परत येतो म्हणाला अन्...

पुलवामा हल्ल्यात उत्तर प्रदेशमधील महाराजगंजमधील पंकजकुमार त्रिपाठी हा जवान शहीद झाला. पंकजकुमार शहीद झाल्याची बातमी माध्यमांद्वारे त्यांच्या गावामधील लोकांना समजल्यापासून गावामध्ये शोकाकूल वातावरण आहे.

लखनौ : पुलवामा हल्ल्यात उत्तर प्रदेशमधील महाराजगंजमधील पंकजकुमार त्रिपाठी हा जवान शहीद झाला. पंकजकुमार शहीद झाल्याची बातमी माध्यमांद्वारे त्यांच्या गावामधील लोकांना समजल्यापासून गावामध्ये शोकाकूल वातावरण आहे. बातमी समजल्यावर पंकजकुमार यांची आई सुशीलादेवी आणि त्यांची पत्नी रोहिणी बेशुद्ध दोघीही झाल्या. शुद्धीवर आल्यानंतर शहीदपत्नी रोहणी त्रिपाठी म्हणाल्या की, "पंकज यांच्यासोबत शेवटचे बोलणं झालं, तेव्हा त्यांनी दोन महिन्यांमध्ये परत येण्याचं वचन दिले होतं." गुरुवारी रात्री पंकजकुमार यांच्या गावामधील लोकांना पंकजकुमार शहीद झाल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी सकाळी संपूर्ण गावभर ‘जब तक सूरज चांद रहेगा, पंकज तेरा नाम रहेगा’ चा जयघोष सुरु झालेला ऐकायला मिळाला. पंकजकुमार त्रिपाठी (35) महराजगंज जिल्ह्यातील हरपूर मिश्र गावातील रहिवासी आहेत. पंकजकुमार शहीद झाल्याची बातमी समजल्यापासून गावामध्ये शोक व्यक्त केला जात आहे. तीन दिवसांपूर्वीच पंकजकुमार सुट्टीहून कर्तव्यावर परतले होते. बुधवारी ते ड्यूटीवर रुजू झाले. घटनास्थळावरुन केवळ मोबाईल आणि ओळखपत्रच सापडले जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर स्फोटकांनी भरलेली गाडी आदळली. त्यामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 40 जवान शहीद झाले. जवानांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले. परंतु पंकज त्रिपाठी यांचा मृतदेह सापडला नाही. घटनास्थळी केवळ त्रिपाठी यांचे ओळखपत्र आणि मोबाईल सापडला आहे. सीआरपीएफ मुख्यालयाने त्रिपाठी यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आहे. त्रिपाठी यांचे कुटुंबीय जम्मूसाठी रवाना झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाचाला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाचाला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
Embed widget