एक्स्प्लोर

भारतीय वायुदलाचे मार्शल अर्जन सिंह यांचं निधन

अर्जन सिंह हे पाच स्टार मिळवणारे भारतीय वायुदलाचे एकमेव अधिकारी होते. 1965 मध्ये त्यांनी वयाच्या 45 व्या वर्षी सर्वात तरुण वायुसेना प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.

नवी दिल्ली : 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय वायुदलाचे मार्शल अर्जन सिंह यांचं निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी अर्जन सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांना लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. लष्करी रुग्णालयातच संध्याकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी अर्जन सिंह यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. https://twitter.com/Gen_VKSingh/status/909068920140599297 कोण होते अर्जन सिंह? अर्जन सिंह हे पाच स्टार मिळवणारे भारतीय वायुदलाचे एकमेव अधिकारी होते. 1965 मध्ये त्यांनी वयाच्या 44 व्या वर्षी सर्वात तरुण वायुसेना प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. अर्जन सिंह यांचा जन्म 15 एप्रिल 1919 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील लिआलपूरमध्ये झाला. कॉलेजमध्ये शिकताना वयाच्या 19 व्या वर्षीच त्यांची निवड एम्पायर वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन उडणाऱ्या भारतीय वायूदलाच्या शेकडो विमानांच्या अग्रभागी असलेल्या एअरक्राफ्टचं सारथ्य करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. 1 ऑगस्ट 1964 ते 15 जुलै 1969 या कालावधीत ते एअर स्टाफचे प्रमुख होते. 1965 मध्ये अर्जन सिंह यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. 1970 मध्ये वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली. 1971 मध्ये अर्जन यांची स्वित्झर्लंडमध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचवेळी त्यांनी व्हॅटिकनचे राजदूत म्हणूनही काम पाहिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. https://twitter.com/narendramodi/status/909083404456517632 https://twitter.com/narendramodi/status/909083228606042112 https://twitter.com/narendramodi/status/909082959713415168 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्विटरवर फोटो शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. https://twitter.com/rashtrapatibhvn/status/909084630120251392

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
Embed widget