Prophet Mohamamd Row : नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल माफी मागितली आहे. भाजप पक्षानेही त्यांच्यावर कारवाई केली, पण हे प्रकरण थांबताना दिसत नाही. यानंतर आता भीम आर्मीचे प्रमुख नवाब सतपाल तंवर यांनी नुपूर शर्मा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नुपूर शर्माची जीभ कापणाऱ्याला त्यांनी 1 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.


अनेक चित्रपट आणि राजकीय व्यक्तींना धमक्या


भीम आर्मीच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे, मात्र पोलिसांनी अद्याप त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. सतपाल तवंत यांनी असे विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सतपाल तवंत यांनी अनेक चित्रपट आणि राजकीय व्यक्तींना धमक्या देऊन वाद निर्माण केला असून आता नूपूरची जीभ कापल्याची चर्चा आहे. भीम सेनेचे संस्थापक आणि अध्यक्ष नवाब सतपाल तन्वर यांनी आरोप केला आहे की, नुपूर शर्मा यांनी पैगंबराचा अपमान केला आहे, ज्यामुळे कोट्यवधी मुस्लिम समाज दुखावला गेला आहे.


आज AIMIM आंदोलन


प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याबाबत नुपूर शर्मा यांच्या बाजूने आणि विरोधामध्ये विविध भाषणबाजी आणि निदर्शने सुरू आहेत. असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष AIMIM दिल्लीतील जंतरमंतरवर नुपूर आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे, तर हिंदू महासभा नुपूर शर्माच्या समर्थनार्थ लखनऊमध्ये पायी मोर्चा काढणार आहे.


नुपूर शर्मांच्या घरावर आता बुलडोझर चालणार का? - ओवेसी


एआयएमआयएसचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत नुपूर शर्माला अटक करावी असे म्हटले होते. नुपूर शर्मांनी माफी मागितली नसून त्यांनी आपल्या वक्तव्यात इंग्रजीत 'इफ' लिहिल्याचे त्यांनी सांगितले. असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, हे सरकार बुलडोझरचे राजकारण करते, काही झाले की बुलडोझर चालवतात, त्यामुळे आता नुपूर शर्माच्या घरावर बुलडोझर चालणार का? ओवेसी म्हणाले, जेव्हा देशातील मुस्लिमांचा प्रश्न येतो तेव्हा पंतप्रधान मोदी त्यांचे ऐकत नाहीत. पंतप्रधानांना भारतीय मुस्लिमांचे दुःख कळत नाही. भाजपने देशातील मुस्लिमांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.



इतर महत्वाच्या बातम्या


Dhule : धुळ्यातील 'एलआयसी किंग'कडे सापडले कोट्यवधीचे घबाड; चार दिवसांपासून झाडाझडती 


Wardha: आर्वी पालिका कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला 'गोल्ड'चा नाद, मोपेड वाहनाला बांधून विहिरीत फेकले