एक्स्प्लोर

पुढच्या वर्षी नोकरदारांना चांगली पगारवाढ, मॅनपॉवर ग्रुपचा दावा

2018 मध्ये नोकरदारांना 10 ते 15 टक्के पगारवाढ मिळू शकते, असा दावा मॅनपॉवर ग्रुपच्या आर्थिक वर्षासंदर्भातील अहवालातून करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : 2017 हे वर्ष नोकरदार वर्गासाठी चढ-उताराचं ठरलं. पण आगामी 2018 हे वर्ष नोकरादारांसाठी चांगले असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण, 2018 मध्ये नोकरदारांना 10 ते 15 टक्के पगारवाढ मिळू शकते, असा दावा मॅनपॉवर ग्रुपच्या आर्थिक वर्षासंदर्भातील अहवालातून करण्यात आला आहे. मॅनपॉवर ग्रुप ही कंपनी विविध कंपन्यांना रोजगाराच्या प्रश्नावर सल्ला देते. या कंपनीने आपला अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात 2018 मध्ये रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असंही म्हटलं आहे. चालू वर्षात नोटाबंदीमुळे कापड उद्योगाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. पण या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत मंदीनंतर रोजगाराच्या संधीमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. कंपनीच्या अहवालात म्हटलंय की, जानेवारी ते मार्च या तिमाहीत रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यामध्ये 22 टक्क्यांची घट झाली. त्यानंतर एप्रिल ते जून दरम्यान देखील ही घसरण 19 टक्के होती. यानंतर जुलै ते सप्टेंबर दरम्यान रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यात 16 टक्क्यांची घट झाल्याचं पाहायला मिळालं. पण ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानच्या तिमाहीत रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यात तब्बल 24 टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे 2018 मध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याच्या प्रमाणात सुधारणा होईल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. यामध्ये मोबाईल उत्पादक आणि सेवा पुरवणाऱ्या कंपनी, फायनान्स क्षेत्र आणि स्टार्ट-अपसह अनेक क्षेत्रातील रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल. याशिवाय, पगारवाढीमध्ये देखील ही वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. 2017 मध्ये पगारवाढीचं प्रमाण 8 ते 10 टक्के होतं. पण 2018 मध्ये ते 10 ते 15 टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ramlila Maidan Protest Charges : सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget