पणजी : मनोहर पर्रिकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता पर्रिकरांचा शपथविधी सोहळा होणार आहे. मात्र काँग्रेसने त्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. काँग्रेसच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात विशेष सुनावणी होणार आहे.

गोवा विधानसभेत काँग्रेसला 17, भाजपला 13, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पक्षाला 3, अपक्षांना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली होती.

काँग्रेस मोठा पक्ष ठरला असला तरी मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री करण्याच्या अटीवर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि दोन अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजप आणि इतर पक्षाच्या मिळून एकूण 21 आमदारांनी राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेचा दावा केला.

गोव्यात सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्याची मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेस हाच गोव्यात सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र काँग्रेसचे वालपोईतील आमदार विश्वजीत राणे यांच्यासह सात आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे गोवा काँग्रेसमध्ये फूट पडण्याची चिन्हं दिसत आहेत.

गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं आहे. तसंच बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिला आहे.

दुसरीकडे भाजपचं सरकार स्थापन करण्यासाठी गोव्याच्या राज्यपालांनी जास्तच घाई दाखवल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे.

मंत्रिमंडळात कोणाची शक्यता :

महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला उपमुख्यमंत्रिपदासह दोन मंत्रिपद मिळणार आहे. मगोपचे सुदिन ढवळीवर यांच्याकडे गोव्याचं उपमुख्यमंत्रिपद सोपवण्यात येणार आहे. तर गोवा फॉरवर्ड फक्षाचे विजय सरदेसाई यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनीही राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे पुन्हा एकदा संरक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली.

संबंधित बातम्या


गोव्यानंतर मणिपूरही काँग्रेसच्या हातातून निसटलं?


संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर... अडीच वर्षात 40 वर्षांचं काम !


गोव्यात भाजपचा सरकार स्थापनेचा दावा, काँग्रेस सुप्रीम कोर्टात


पर्रिकरांचा राजीनामा, अरुण जेटली पुन्हा संरक्षण मंत्री!


गोव्यात भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना मंत्रिपदं : सूत्र


गोव्यात शिवसेनेचा दारुण पराभव, तीन उमेदवारांना एकूण 792 मतं


भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड कमावलं, गोवा मात्र गमावलं


गोव्यात मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सहा मंत्र्यांचा पराभव