एक्स्प्लोर

मनोहर पर्रिकर गोव्याचे 13वे मुख्यमंत्री, कोंकणीतून शपथ

पणजी: सुप्रीम कोर्टानं मनोहर पर्रिकरांच्या शपथविधीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्यांनी आज गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी पर्रिकर यांनी कोकणी भाषेत शपथ घेतली. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रिकर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि महत्वाचे नेते हजर होते. विधानसभा निवडणुकीत 40 पैकी काँग्रेसला सर्वाधिक 17 भाजपला 13 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पार्टीला 3 जागा मिळाल्या होत्या. तर अपक्षांना 3 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. त्यातील मगोप, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं भाजपचं संख्याबळ 21 वर आलं. दुसरीकडे मुख्यमंत्री झालेल्या पर्रिकर यांना अवघ्या 48 तासात म्हणजे गुरुवारी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. तसे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. सरन्यायाधीश जे.एस.खेहर यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. दरम्यान, या शपथविधी आधी बराच गोंधळ पाहायला मिळाला. पर्रिकर यांच्या शपथविधीला काँग्रेसनं थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र, कोर्टानेही राज्यपालांप्रमाणेच निर्णय देत, बहुमत सिद्ध करण्याचे आदेश काँग्रेसला दिले आहेत. त्यामुळे 16 मार्चला म्हणजे दोनच दिवसात सकाळी 11 वाजता पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. याशिवाय मनोहर पर्रिकर यांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची काँग्रेसची मागणीही सुप्रीम कोर्टाने फेटाळली. तसंच नवं सभागृह अस्तित्त्वात आल्याचं आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना काढण्याची विनंती निवडणूक आयोगाला उद्याच करावी लागणार आहे. गोव्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपने तयारी केली असतानाच, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्याने मोठा पेच निर्माण झाला. अभिषेक मनू सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात काँग्रेसची बाजू मांडली, तर भाजपकडून ज्येष्ठ विधीज्ञ हरिष साळवे मैदानात उतरले. मनोहर पर्रिकरांच्या मंत्रिमंडळात कोण-कोण? मनोहर पर्रिकर – मुख्यमंत्री, भाजप फ्रांसिस डिसूजा- भाजप पांडुरंग मडकेकर- भाजप सुदिन ढवळीकर- मगोप मनोहर त्रिंबक अजगांवकर- मगोप विजय सरदेसाई- गोवा फॉरवर्ड पार्टी विनोद पलियंकर- गोवा फॉरवर्ड पार्टी जयेश विद्याधर साळगांवकर- गोवा फॉरवर्ड पार्टी गोविंद गौडे- अपक्ष रोहन खाउंटे- अपक्ष सुप्रीम कोर्टाचे काँग्रेसला प्रश्न
  • सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश खेहर जे, रंजन गोगोई आणि जे आर के अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर गोव्याच्या रणसंग्राम रंगला.
  •  काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका केल्याने, सरन्यायाधीश खेहर यांनी पहिलाच प्रश्न काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना केला.
  •  तुमच्याकडे किती आमदारांचं संख्याबळ आहे किंवा कोणत्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे, याबाबत काही कागदपत्र सादर केली आहेत का?
  • तुम्ही किती आमदारांचा पाठिंबा आहे हे दाखवलं असतं, तर ही केस अवघ्या 30 सेकंदात निकाली निघाली असती, असंही कोर्टाने सिंघवींना सांगितलं.
  • तुम्हाला त्यासाठी पुरेसा वेळ होता, एक संपूर्ण रात्रही होती. तडजोडीसाठी रात्रीचीच वेळ चांगली असते,  मात्र तरीही तुम्हाला कुणाचा पाठिंबा आहे, हे सांगणारं एक कागदाचं चिटूरही  सादर करता आलं नाही, असा मिश्किल टोला कोर्टाने लगावला.
  • तुमचं जे म्हणणं राज्यपालांसमोर मांडायला हवं होतं, ते कोर्टासमोर मांडत आहात. तुम्ही कोर्टात येण्यापूर्वी राज्यपालांकडे म्हणणं मांडणं आवश्यक होतं.
  • तुम्ही राज्यपालांकडेही तुम्हाला पाठिंबा असलेल्या आमदारांबाबत किंवा संख्याबळाबाबत काहीही सांगितलं नाही आणि आता तुम्ही कोर्टाला म्हणता, हा गुंता सोडवा.
  सुप्रीम कोर्ट भाजपला काय म्हणालं? भाजप हे पॉवरफुल्ल आहे, ते काहीही करु शकतात, असं काँग्रेस म्हणतंय, असं कोर्टाने भाजपचे वकील हरिष साळवे यांना सांगितलं.  तसंच सुनावणी दरम्यान कोर्ट बहुमताबाबतचे आदेश देऊ शकतं का अशी विचारणा केली. त्यावर साळवेंनी नाही असं सांगितलं. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने शपथविधीला स्थगिती न देता, बहुमत सिद्ध करण्याचा अवधी 15 दिवसांवरुन 2 दिवसांवर आणला.   गोव्यात कुणाला किती जागा? दरम्यान, काँग्रेस आमदारही आज राज्यपालांना भेटून बहुमताचा दावा करणार आहेत.  एकूण 40 जागांपैकी 17 जागा जिंकत गोव्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. मात्र 13 जागा जिंकणाऱ्या भाजपनं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (3), गोवा फॉरवर्ड पक्ष (3), राष्ट्रवादी (1) आणि अपक्षाच्या (3) साथीनं बहुमताचा दावा केलाय. त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मनोहर पर्रिकर मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेणार आहेत. संबंधित बातम्या: पर्रिकरांच्या शपथविधीला स्थगिती नाही, बहुमतासाठी 2 दिवसांचा अवधी! गोव्यानंतर मणिपूरही काँग्रेसच्या हातातून निसटलं? संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर… अडीच वर्षात 40 वर्षांचं काम ! गोव्यात भाजपचा सरकार स्थापनेचा दावा, काँग्रेस सुप्रीम कोर्टात पर्रिकरांचा राजीनामा, अरुण जेटली पुन्हा संरक्षण मंत्री! गोव्यात भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना मंत्रिपदं : सूत्र गोव्यात शिवसेनेचा दारुण पराभव, तीन उमेदवारांना एकूण 792 मतं भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड कमावलं, गोवा मात्र गमावलं गोव्यात मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सहा मंत्र्यांचा पराभव

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Naxal News: झारखंडमध्ये CRPF च्या कोब्रा दलाची मोठी कारवाई; तब्ब्ल 1 कोटींचं बक्षीस असलेल्या कुख्यात नक्षली कमांडर मिसिर बेसराला अटक, स्फोटकांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
झारखंडमध्ये CRPF च्या कोब्रा दलाची मोठी कारवाई; तब्ब्ल 1 कोटींचं बक्षीस असलेल्या कुख्यात नक्षली कमांडर मिसिर बेसराला अटक, स्फोटकांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Embed widget