एक्स्प्लोर

...म्हणून मनोहर पर्रिकरांनी स्कूटर चालवणं सोडलं

अपघातांच्या भीतीमुळे त्यांनी स्कूटर चालवणं सोडून दिल्याचं खुद्द पर्रिकरांनी सांगितलं आहे.

पणजी/ गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर त्यांच्या सरळ आणि साध्या स्वभावामुळे सर्वांना परिचित आहेत. त्यांचं गोव्यातून स्कूटरवरुन फिरणं अनेकदा माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. शिवाय, त्यांच्या स्कूटरवरुन फिरण्यावरुन अनेक किस्सेही प्रसिद्ध आहेत. पण आता त्यांनी स्कूटर चालवणं बंद केलं आहे. विशेष म्हणजे, या पाठीमागे माध्यमांमधून येणाऱ्या बातम्या किंवा त्याबाबत सांगितले जाणारे किस्से हे कारण नाही. तर अपघातांच्या भीतीमुळे त्यांनी स्कूटर चालवणं सोडून दिल्याचं सांगितलं आहे. शनिवारी गोव्यातील कानाकोनामध्ये भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी याबाबतचा उलगडा केला आहे. पर्रिकर म्हणाले की, “सध्या लोक मला नेहमी विचारतात की, तुम्ही खरंच स्कूटरवरुन प्रवास करता का? तर मी त्यांना सांगतो, हो पूर्वी करत होतो. पण आता सोडून दिलं आहे.” या मागचं कारण स्पष्ट करताना पर्रिकर पुढे म्हणाले की, “माझ्या मनात कामासंदर्भात विचारचक्र नेहमीच सुरु असतं. त्यातच स्कूटर चालवताना जर माझं लक्ष विचलित झालं, तर मला एखाद्या मोठ्या अपघाताला मला सामोरं जावं लागेल. म्हणून मी आता स्कूटर चालवणं सोडून दिलं आहे.” दरम्यान, पर्रिकर पणजीमधील बाजारात सामान खरेदीसाठी स्कूटरवरुन जात असल्याचं वृत्त यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रांमधून नेहमीच प्रसिद्ध झालं आहे. पण आता त्यांचं स्कूटरवरुन जाणं बंद झाल्याने अनेकवेळा यावरुन प्रश्न उपस्थित केला जायचा. पण त्याला मनोहर पर्रिकरांनीच उत्तर दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, दरात घसरण होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती
मोठी बातमी! साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, दरात घसरण होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती
अमित शाहांनी 20 जुलैला चूक केली, ती चूक तुम्ही करू नका; अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार
अमित शाहांनी 20 जुलैला चूक केली, ती चूक तुम्ही करू नका; अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार
Flydubai Incident : कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, यंदा देशभरात किती झाला पाऊस? भारतीय हवामान विभागानं दिली महत्वाची आकडेवारी 
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, यंदा देशभरात किती झाला पाऊस? भारतीय हवामान विभागानं दिली महत्वाची आकडेवारी 

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Investment Summit : महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
Maharashtra Drought : आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
Embed widget