एक्स्प्लोर
मनोहर पर्रिकर लिलावती रुग्णालयात दाखल
अमेरिकेतील स्लोन केटरिंन रुग्णालयात 11 दिवस उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री पर्रिकर 22 ऑगस्ट रोजी गोव्यात दाखल झाले होते.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना काल (23 ऑगस्ट) अस्वस्थ वाटू लागल्याने सायंकाळी तातडीने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बुधवारीच पर्रिकर अमेरिकेतून गोव्यात आले होते. उलटी होऊ लागल्याने काल त्यांना मुंबईतील डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्वरित मुंबईला हलवण्यात आलं. पर्रिकर काल सायंकाळी 4.15 च्या विमानाने मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांचा धाकटा मुलगा आणि डॉ. कोलवाळकर मुंबईत दाखल झाले आहेत. पुढील दोन दिवस त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार केले जातील. सध्या नगर विकासमंत्री फ्रान्सिस डिसुझा हेदेखील अमेरिकेलाच उपचारांसाठी गेले आहेत. ऊर्जामंत्री पांडुरंग मडकईकर हे गेले तीन महिने मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. गोव्याचे दोन मंत्री अनुक्रमे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि कृषी मंत्री विजय सरदेसाई हे विदेशात खासगी भेटीवर गेले आहेत. सरदेसाई येत्या 26 रोजी परत येतील, तर आरोग्य मंत्री विश्वजीत राणे 2 सप्टेंबरला गोव्यात दाखल होतील. गेले काही आठवडे मंत्रिमंडळाच्या बैठकाही होऊ शकलेल्या नाहीत. आजारी मंत्र्यांचा परिणाम प्रशासकीय कामावर होऊ लागला आहे. अमेरिकेतील स्लोन केटरिंन रुग्णालयात 11 दिवस उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री पर्रिकर 22 ऑगस्ट रोजी गोव्यात दाखल झाले होते. येताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी घेऊन ते गोव्यात आले. आज ते अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार होते. मात्र अचानक उपचारासाठी मुंबईत जावे लागल्याने इतर नेत्यांच्या हस्ते अटलजींच्या अस्थींचे विसर्जन करावे लागणार आहे.
Before You Go
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट






















