मुंबई : उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये भाजप, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी समाजवादी पक्षाला भुईसपाट करत भाजपने मोठं यश मिळवलं. त्यामुळे 2012 च्या निवडणुकांमध्ये तुरळक ठिकाणी दिसणाऱ्या भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं चित्र आहे.

गोवा, मणिपूरमध्ये भाजपला सर्वाधिक मतं

मणिपूरसारख्या राज्यात भाजपचं काहीही अस्तित्व नसताना मोदी लाटेच्या जोरावर भाजप सर्वात जास्त मतं मिळवणारा पक्ष ठरला. मणिपूरमध्ये सर्वात जास्त जागा मिळवलेल्या काँग्रेसने 35.1 टक्के, तर भाजपने 36 टक्के मतं मिळवली.

गोव्यातही भाजपची पिछेहाट झाली असली तरी मतं मात्र सर्वाधिक मिळवली आहेत. गोव्यात सुभाष वेलिंगकरांचं बंड भाजपच्या अंगलट आल्याचं चित्र आहे. कारण काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्या तरी मतं मात्र भाजपला जास्त मिळाली आहेत. भाजपला 32.5 टक्के तर काँग्रेसला 28.4 टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे गोवा सुरक्षा मंच आणि भाजपात जे मतविभाजन झालं, त्याचा फायदा थेट काँग्रेसला झाला.

2012 चं चित्र काय होतं?

उत्तर प्रदेश :

  • सपा- 224

  • बसपा 80

  • भाजप 47

  • काँग्रेस 28

  • रालोद- 09

  • इतर- 15


एकूण - 403

पंजाब :

  • काँग्रेस 46

  • भाजप 12

  • शिरोमनी अकाली दल 56

  • इतर 3


एकूण - 117

उत्तराखंड :

  • भाजप 31

  • काँग्रेस 32

  • बसपा 3

  • इतर- 4


एकूण- 70

गोवा :

  • भाजप 21

  • गोवा फॉरवर्ड पार्टी 2

  • काँग्रेस 9

  • महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी 3

  • इतर 5


एकूण - 40

मणिपूर :

  • काँग्रेस 42

  • तृणमूल काँग्रेस 7

  • MSCP 5

  • नागा पीपल्स फ्रंट 4

  • इतर 2


एकूण- 60

2017 ची पाच राज्यातील परिस्थिती

उत्तर प्रदेशात कोणत्या पक्षाला किती जागा?

  • भाजप – 312 +( अपना दल 9, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 4) = 325

  • समाजवादी पक्ष – 47

  • काँग्रेस – 7

  • बसपा – 19

  • राष्ट्रीय लोक दल – 1

  • इतर -04


उत्तराखंडमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?

  • भाजप – 57

  • काँग्रेस – 11

  • अपक्ष – 2

  • एकूण – 70


पंजाबमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?

  • काँग्रेस : 77

  • आम आदमी पक्ष : 20

  • अकाली दल 15 + भाजप 3 : 15

  • लोक इन्साफ पार्टी : 02


गोव्यात कुणाला किती जागा?

  • भाजप – 13

  • काँग्रेस – 17

  • राष्ट्रवादी काँग्रेस -1

  • महाराष्ट्रवादी गोमंतक – 3

  • गोवा फॉरवर्ड पार्टी – 3

  • अपक्ष/इतर – 3


मणिपूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?

  • भाजप – 21

  • काँग्रेस – 28

  • नागा पीपल्स फ्रंट – 4

  • नॅशनल पीपल्स पार्टी – 4

  • तृणमूल काँग्रेस  -1

  • अपक्ष – 1

  • लोकजनशक्ती पार्टी – 1


संबंधित बातम्या :

Assembly Election Result 2017 : पाच राज्यांचे अंतिम निकाल


देशातील 12 राज्य भाजपमय, काँग्रेसचं अस्तित्व नगण्य


UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल


Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल


GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल


Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल


Manipur Assembly Election Result 2017: मणिपूर विधानसभा अंतिम निकाल