Manipur Election Result 2022 : मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 60 पैकी 59 जागांचे निकाल हाती आले आहेत. मणिपूरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.  60 जागांमधील भाजपचा 32 जगांवर विजय झाला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता असून मणिपूरच्या जनतेने भाजपला स्पष्ट भहुमत दिले आहे. तर काँग्रेसला फक्त पाच जागांवर विजय मिळवता आला आहे. याशिवाय एनपीएफ पाच, एनपीपी सहा, जनता दल (संयुक्त) सहा आणि इतर उमेदवारांचा पाच जागांवर विजय झाला आहे. तर एनपीपी एका जागेवर आघाडीवर आहे. 


मणिपूरमध्ये 32 जागा जिंकत पुन्हा एकदा भाजपने विधानसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी करत बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पत्रकारितेतून राजकारणी झालेले नॉन्गथोम्बम बिरेन सिंग हे राजकारणात प्रवेश केल्यानंतर 20 वर्षात सलग दुसऱ्यांदा भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत दहशतवादग्रस्त मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे तसेच डोंगराळ प्रदेशातील आणि खोऱ्यातील लोकांमधील तेढ दूर करण्याचे श्रेय एन बिरेन सिंग यांना जात आहे. त्यामुळेच मणिपूरच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवत भाजपला स्पष्ट भहुमत दिले आहे. 


विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री नॉन्गथोम्बम बिरेन सिंग यांनी राजधानी इंफाळमध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत डान्स करून आनंद व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले, "मी मणिपूरच्या जनतेचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही मणिपूरमध्ये विजय मिळवू शकलो. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यातील पक्षाचा विजय पंतप्रधान मोदींच्या 'सबका साथ सबका विकास' या मंत्राचे प्रतिबिंबही देतो."


दरम्यान, 2017 च्या निवडणुकीत 28 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. परंतु, भाजपने काँग्रेच्या काही आमदारांमध्ये फूट पाडून त्यांना आपल्यासोबत घेत सत्ता स्थापन केली होती.


मणिपूरमधील भाजपचे विजयी उमेदवार


थौनौजम श्यामकुमार (Andro मतदारसंघ)
कोंथौजम गोविंदसिंग  (Bishenpur मतदारसंघ)


एस.एस. ऑलिश (Chandel मतदारसंघ)


नॉंगथोम्बम बीरेन सिंग (Heingang मतदारसंघ)


ठोकचोम राधेश्याम सिंग(Heingang मतदारसंघ)
लेटझामंग हाओकिप(Henglep मतदारसंघ)


डॉ. युम्नाम राधेश्याम सिंह (Hiyanglam मतदारसंघ)


नेमचा किपगेन (Kangpokpi मतदारसंघ)
लोरेम्बम रामेश्वर मीतेई (Keirao मतदारसंघ)
लीशांगथेम सुसिंद्रो मेईती (Khurai मतदारसंघ)
डॉ. सपम रंजन सिंग (Konthoujam मतदारसंघ)
सणसम प्रेमचंद्र सिंह (Kumbi मतदारसंघ)


खोंगबंतबम इबोमचा (Lamlai मतदारसंघ)
करम श्याम (Langthabalमतदारसंघ)
कोंगखाम रॉबिंद्रो सिंग(Mayang Imphal मतदारसंघ)
थौनौजम बसंत कुमार सिंह (Nambol मतदारसंघ)
सगोलशेम केबी देवी (Naoriya Pakhanglakpa मतदारसंघ)


डिंगंगलुंग गंगमेई (Nungba मतदारसंघ)
सपम कुंजकेश्वर सिंग (Patsoi मतदारसंघ)
राजकुमार इमो सिंग (Sagolband मतदारसंघ)
पाओलियनलाल हाओकीप (Saikot मतदारसंघ)
हेखम डिंगो सिंग (Sekmai मतदारसंघ)
यमनाम खेमचंद सिंग (Singjamei मतदारसंघ)
लेतपाओ हाओकीप (Tengnoupal मतदारसंघ)
टोंगब्रम रॉबिंद्रो सिंग (Thanga मतदारसंघ)
वूनगझाईन वाल्टे (Thanlon मतदारसंघ)
 वूनगझाईन वाल्टे (Thanlon मतदारसंघ) 
थोंगम बिस्वजित सिंग  (Thongju मतदारसंघ) 
खवैरकपम रघुमणी सिंह (Uripok मतदारसंघ) 
डॉ. उषम देबेन सिंह (Wabgai मतदारसंघ) 


पॉनम ब्रोजेन सिंग (Wangjing Tentha मतदारसंघ) 
ठोकचोम सत्यब्रत सिंग (Yaiskul मतदारसंघ) 


महत्वाच्या बातम्या