UP Election Result 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप मोठ्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवलाय. त्यांनी तब्बल एक लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. याच मतदार संघातून लढणाऱ्या भीम आर्मीचे चंद्रशेखर यांचं डिपॉझिट जप्त झालाय. त्यांना केवळ 5 हजार 409 मत मिळाली आहेत.
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकाल पाहता यूपीत पुन्हा एकदा भाजपचं सरकार स्थापन होत असल्याचं चिन्ह दिसत आहेत. दरम्यान, गोरखपूर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ विजयी झाले आहेत. तर, गोरखपूर ग्रामीण मतदारसंघातूनही भाजपचे उमेदवार विपिन सिंह विजयी झाले आहेत. त्यांनी सपाचे विजय बहादूर यादव यांचा पराभव केलाय. यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर सदरची जागा जिंकली होती.
भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकाल पाहता भाजपमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पक्षाच्या दणदणीत विजयानं उत्साहात असलेले कार्यकर्ते होळीपूर्वीच रंग आणि गुलालाची होळी खेळत आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील भाजप कार्यालयाबाहेर आणि आजूबाजूला कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य पिछाडीवर
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सातत्यानं पिछाडीवर आहेत. मौर्य कौशाम्बी-सिराथू येथून सतत पिछाडीवर आहेत. सध्या ते 2 हजार 100 मतांनी पिछाडीवर आहेत. तर, या मतदारसंघात पल्लवी पटेल आघाडीवर आहेत.
हे देखील वाचा-
- UP Election Result 2022 : कोण होणार यूपीचा नवा कारभारी ? मॅजिक फिगर गाठण्यासाठी दिग्गजांची धडपड
- UP Election Result : आग्रा भाजपचेच, सलग दुसऱ्यांदा 'क्लीन स्वीप'; सर्व नऊ जागांवर मिळवला विजय
- Election 2022 : भाजपचं घवघवीत यश, पाच पैकी चार राज्यात भाजपला एकहाती सत्ता, पंजाबमध्ये आपला कौल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha