एक्स्प्लोर
VIDEO : असं गंगापूजन कधी पाहिलंय का?
वाराणसीतील मंत्रोच्चाराच्या घोषात गंगापूजन पाहणे लाखो भक्तांचे स्वप्न असते. हे विंहगम दृश्य पाहण्यासाठी लाखो भक्त देश-विदेशातून दाखल होतात. पण सध्या सोशल मीडियात असंच अनोखं गंगापूजन व्हायरल होत आहे. त्याला नेटिझनकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नवी दिल्ली : वाराणसीतील मंत्रोच्चाराच्या घोषात गंगापूजन पाहणे लाखो भक्तांचे स्वप्न असते. हे विंहगम दृश्य पाहण्यासाठी लाखो भक्त देश-विदेशातून दाखल होतात. पण सध्या सोशल मीडियात असंच अनोखं गंगापूजन व्हायरल होत आहे. त्याला नेटिझनकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सोशल मीडियात गंगापूजनाचा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक तरुण आकाशात भरारी घेऊन, गंगेची आरती करत असल्याचं दिसत आहे. हा तरुण आकाशात स्वत: भोवती प्रदक्षिणा मारतच गंगापूजन करत आहे.
या तरुणाने यासाठी फ्लायबोर्ड (हायड्रॉलिक पंप जेट)चा वापर केला आहे. नेटिझनकडूनही या व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, या व्हिडीओतील तरुण कोण आहे, याची माहिती मिळाली नाही. पण हा व्हिडीओ HT Media Work द्वारे यूट्यूबवर पोस्ट केला आहे. हे अनोखं गंगापूजन सुरु असताना, ते पाहण्यासाठी उपस्थित एका व्यक्तीने हे दृश्य आपल्या मोबाईच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement