एक्स्प्लोर
महिला तहसीलदाराला भरदिवसा जिवंत जाळले
अब्दुल्लापुरमेट येथील त्यांच्या कार्यालयात रेड्डी बसलेल्या असताना हल्लेखोराने कार्यालयात घुसून पेट्रोल ओतून पेटवून दिलं आणि त्यानंतर हल्लेखोर पळून गेला. रेड्डी यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे दोन कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
हैदराबाद : निवडणुकीच्या कालावधीत महिला वन अधिकाऱ्याला मारहाणीची घटना ताजी असताना तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात कार्यालयातच महिला तहसीलदाराच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अब्दुल्लापुरमेट येथील तहसीलदार कार्यालयात दुपारी एक व्यक्ती थेट कार्यालयात आली आणि त्यांच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. न्यायालयाने आदेश देऊनही तहसीलदारांनी हल्लेखोराच्या जमिनीच्या दस्तावेजांमधील त्रुटी दुरुस्त केल्या नाहीत. या नाराजीतून त्यानं हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.
विजया रेड्डी (37) असं महिला तहासीलदार अधिकाऱ्याचं नाव आहे. अब्दुल्लापुरमेट येथील त्यांच्या कार्यालयात रेड्डी बसलेल्या असताना हल्लेखोराने कार्यालयात घुसून पेट्रोल ओतून पेटवून दिलं आणि त्यानंतर हल्लेखोर पळून गेला. रेड्डी यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे दोन कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
सुरेश मुदिराजू असं या हल्लेखोराचं नाव आहे. त्यानं रेड्डी यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिलं आणि कार्यालयाबाहेर पळून गेला. त्यावेळी सुरेशही भाजला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
VIDEO | टॉप 25 न्यूज बुलेटिन | 05 नोव्हेंबर 2019 | ABP Majha
तहसील कार्यालयात दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. त्यामुळं कार्यालयात गर्दी नव्हती. त्याचवेळी सुरेश कार्यालयात आला आणि त्यानं रेड्डी यांच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि पेटवून दिले. यामध्ये सुरेश 60 टक्के भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही तहसीलदारांनी त्याच्या जमिनीच्या दस्तावेजांमधील त्रुटी दुरुस्त केल्या नाहीत. त्यामुळं तो प्रचंड नाराज होता, म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले आहे. कार्यालात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळं कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेचा निषेध करत अन्य कर्मचाऱ्यांनी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement