एक्स्प्लोर

केजरीवालांच्या घरी जिवंत काडतुसांसह एकाला अटक

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडे .32mm ची जिवंत काडतुसं सापडली आहेत.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडे .32mm ची जिवंत काडतुसं सापडली आहेत. काही दिवसांपूर्वी सचिवालयात केजरीवाल यांच्यावर झालेल्या मिरची हल्ल्याबाबत दिल्ली विधानसभेने विशेष सत्र बोलावले होते. हे सत्र केजरीवाल यांच्या घरासमोरच सुरु होते. त्यावेळी जिवंत काडतूस घेऊन आलेल्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी केलेल्या चेकिंगदरम्यान एका व्यक्तीच्या पाकिटामध्ये जिवंत काडतूस सापडली आहेत. या व्यक्तिचे नाव मोहम्मद इम्रान आहे. त्याला अटक करुन पोलीस सध्या इम्रानची चौकशी करत आहेत. इमरान हा सीलमपूर येथील रहिवाशी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. इम्रानसोबत आणखी 12 जण या सत्राला हजर होते. इम्रान आणि त्याच्यासोबतचे 12 जण दिल्ली वक्फ बोर्डामध्ये कार्यरत असल्याचे इम्रानने सांगितले. दिल्ली वक्फ बोर्डातील कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी, अशी शिफारस करण्यासाठी ते केजरीवाल यांना भेटण्यासाठी आले होते, अशी माहिती इम्रानने पोलिसांना दिली. मोहम्मद इम्रानकडे जिवंत काडतूस सापडल्याने अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने मिरची पूड फेकल्याची घटना घडली होती. या दोन प्रकरणांमुळे केजरीवालांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Video Row : मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे आक्रमक
मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, निशिकांत दुबे आक्रमक 
Prashant Kishor : भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Embed widget