एक्स्प्लोर

नाभा जेलमधून दहशतवाद्यांना पळण्यास मदत करणारा अटकेत

चंदीगढ (पंजाब) : पंजाबमधला सर्वात सुरक्षित मानला जाणारा जेल म्हणजे नाभा. पण याच जेलमधून कुख्यात दहशतवाद्यांनी पलायन केलं. दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या परमिंदर सिंहला उत्तर प्रदेशच्या शामलीमधून अटक करण्यात आली आहे. तर अतिरेकी समजून एका निष्पाप तरुणीवर पोलिसांनी केेलेल्या गोळीबारात तिचा मृत्यू झाला आहे. पलायन केलेल्या कैद्यांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे यात एका दहशतवदी संघटनेच्या म्होरक्याचाही समावेश आहे. एकूण 5 जणांनी तुरुंगात पोलिसांच्या वेशात प्रवेश केला. त्यातल्या एकानं बेड्याही ठोकल्या होत्या. पण जेलमध्ये प्रवेश करताच पाचही जणांनी फायरिंग सुरु केली. बंदुकीच्या धाकानं या पाच जणांनी 6 कैद्यांना फरार केलं आणि भरधाव वेगाने पळ काढला. फरार झालेल्या अतिरेक्यांमध्ये 2014 साली अटक झालेल्या हरमिंदरसिंह मिंटूचाही समावेश आहे. 47 वर्षीय हरमिंदरसिंह मिंटूवर डेरा सच्चा सौदाच्या राम रहीम यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. 2010 मध्ये हलवाडा हवाई तळावर स्फोटकं पेरल्याचा त्याचावर आरोप आहे. खलिस्तान लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा तो प्रमुख आहे. खलिस्तान चळवळीसाठी निधी गोळा करण्याचं काम तो करतो. खलिस्तानी संघटनेत तरुणांना आकर्षित करण्यासाठी इंटरनेटचा पुरेपुर वापर तो करतो. एकूण 10 दहशतवादी कारवायांप्रकरणी तो अटकेत होता. एकीकडे दहशतवादी तर पसार झाले. पण पंजाब पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यानही एक धक्कादायक घटना घडली. अतिरेकी समजून एका निष्पाप तरुणीवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या. महिन्याभरापूर्वी भोपाळमधून 6 अतिरेक्यांनी पलायन केलं. पण 24 तासात त्यांचा खात्मा झाला. आता एका दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हातावर तुरी देऊन पळाला आहे. त्यामुळे जेलच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा आ वासून उभा राहिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget