मुंबई : ठाण्यातील दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. अंमली पदार्थ खटल्यात बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीचं नाव आल्यानंतर, आता तिची न्यायालयीन लढाई, राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार माजीद मेमन लढणार आहेत.


 

ठाणे पोलिसांनी ममता कुलकर्णीला या ड्रग्ज प्रकरणात गोवल्याचा दावा माजीद मेमन यांनी केला आहे. ठाणे पोलिसांनी  ममता कुलकर्णी आणि तिचे पती विकी गोस्वामी यांना या प्रकरणात कशाप्रकारे गोवलं, याचा पर्दाफाश करण्याचा दावा, माजीद मेमन यांनी केला आहे.

 

याबाबतची अधिक माहिती देण्यासाठी माजीद मेमन उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ममता कुलकर्णीचे अमेरिकेतले वकील डँनियल अर्शक उपस्थित राहणार आहेत.

 

डँनियल अर्शक हे देवयानी खोब्रागडे यांच्यावरील अमेरिकेतील खटल्यातील वकील होते. त्याचप्रमाणे केनियाचे प्रसिद्ध वकील क्लिफ ओंबेटा हे देखील ममता कुलकर्णी बाजू मांडतील. त्याचबरोबर माजीद मेमन यांच्या एम. झेड. एम. लीगलचे परवेज मेमन हे ममता कुलकर्णीचे प्रतिनिधित्व करतील, असं सांगण्यात येत आहे.

 

यासर्व प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय पातळीवर व्हावी यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय गृहराज्य मंत्री किरेन रीजीजू यांना पत्र पाठवणार असल्याचं, ममता कुलकर्णीकडून सांगण्यात येत आहे.

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

एप्रिल आणि मे महिन्यात ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामीचं नाव समोर आलं होतं. विकी गोस्वामी सध्या केनियामध्ये आहे.

 

सोलापुरातील 2200 कोटींचं ड्रग्ज साठा प्रकरण: मास्टरमाईंड अखेर गजाआड


 

कल्याणमध्ये 12 एप्रिल रोजी पहिल्यांदा एका नायजेरियन ड्रग डिलरला अटक करण्यात आली होती. नायजेरियन डिलरच्या माहितीनुसार, ठाण्यातून  2 तरुणांना अटक करण्यात आली. या दोन्ही तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या. या सगळ्यांच्या माहितीनंतर सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक कंपनीवर छापा मारण्यात आला. या कंपनीतून 2000 कोटी रुपये किंमतीचं एफिड्रिन ड्रग्ज सापडलं.

 

या रॅकेटमध्ये आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही अनेक आरोपी फरार असून याचा मास्टरमाईंड ममता कुलकर्णीचा पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट किंग विकी गोस्वामी आहे. आता ममता कुलकर्णीविरोधातही पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.

 

संबंधित बातम्या


ड्रग्ज प्रकरणी ममता कुलकर्णीचं नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव: साक्षीदार

ममता कुलकर्णी ड्रग्ज रॅकेटमध्ये, ठाणे पोलिसांकडून शिक्कामोर्तब !

एफिड्रिन ड्रग प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या नवऱ्याचं नाव

सोलापुरातील 2200 कोटींचं ड्रग्ज साठा प्रकरण: मास्टरमाईंड अखेर गजाआड

ठाणे इफेड्रीन ड्रगप्रकरणात माजी आमदाराचा मुलगा?

18 टन, 2 हजार कोटींचं एफेड्रिन ड्रग्ज जप्त

सोलापुरात 200 कोटींचं एफिड्रिन ड्रग जप्त