एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Setback for Mamata Banerjee | पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ममता बॅनर्जींना झटका, दोन आमदारांसह 60 नगरसेवकांचा भाजपत प्रवेश
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ममतांना झटका, 2 आमदारांसह 50हून अधिक नगरसेवकांचा भाजपत प्रवेश, सीपीएमच्याही एका आमदाराचा प्रवेश
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकून मोठं यश मिळवणाऱ्या भाजपने तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे दोन आमदार आणि 50 पेक्षा जास्त नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत.
भाजपचे माध्यम प्रभारी आणि राज्यसभेचे खासदार अनिल बलुनी म्हणाले, "बंगालच्या अनेक नेत्यांनी भाजपच्या कुटुंबात प्रवेश केला आहे. आज बंगालमधील तीन आमदार आमच्यात सामील आहेत. यात टीएमसीचे शुभ्रांशु रॉय, तुषार कांती भट्टाचार्य आणि सीपीएम आमदार देवेंद्र रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे”.
West Bengal | फोडाफोडीचं राजकारण, तृणमूलचे तीन आमदार आणि 60 नगरसेवर भाजपमध्ये | कोलकाता | ABP Majha
दरम्यान ज्याप्रमाणे लोकसभेचं मतदान बंगालमध्ये 7 टप्प्यात झालं, त्याचप्रमाणे आणखीनही बंगालमधील आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश 7 टप्प्यांमध्ये होईल, असं सूचक वक्तव्य भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे.
पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीतील पक्षीय बलाबल टीएमसी 22 भाजप 18 काँग्रेस 2Two TMC MLAs and one CPM MLA from West Bengal join BJP at party headquarters in Delhi. More than 50 Councillors also join BJP pic.twitter.com/9cJ0gTn9FC
— ANI (@ANI) May 28, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement