एक्स्प्लोर

Mamata Banerjee: ...तर काँग्रेसला लोकसभेसाठी बलिदान द्यावं लागणार; ममता बॅनर्जींचे सूचक वक्तव्य

Mamata Banerjee on 2024 Lok Sabha: आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

Mamata Banerjee on 2024 Lok Sabha:  कर्नाटक विधानसभा निकालानंतर (Karnataka Election Results) आगामी लोकसभा निवडणुकांच्या चर्चांना जोर आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज महत्त्वाचे वक्तव्य केले. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला (Congress) नमतं घ्याव लागणार असल्याचे त्यांनी म्हटले. ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, त्या ठिकाणी काँग्रेसने कमी जागा लढवाव्यात असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले. ममता यांनी काँग्रेसने 200 जागांवर निवडणूक लढवावी असे स्पष्टच म्हटले. 

ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, आम्ही केलेल्या विश्लेषणानुसार काँग्रेस 200 जागांवर मजबूत आहे. त्या जागांवर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मात्र, काँग्रेसला इतर राजकीय पक्षांनादेखील पाठिंबा द्यावा लागणार आहे. आम्ही कर्नाटकमध्ये काँग्रेसला पाठिंबा देणार असू तर त्यांनी आम्हाला पश्चिम बंगालमध्ये पाठिंबा द्यायला हवा, असे ममता यांनी म्हटले. काँग्रेसला काही हवं असेल तर त्यांनी काही गोष्टींचा त्याग करण्याची आवश्यकता आहे, असेही ममता यांनी म्हटले. 

ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, या महिन्याच्या अखेरीस त्या दिल्लीला जाणार आहेत. 27 मे रोजी होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला त्या उपस्थित राहतील. राज्याचे प्रश्न मांडण्यासाठी दुसरा पर्याय नाही. त्यामुळे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. आपल्या दिल्ली दौऱ्याच्या दरम्यान, विरोधकांच्या बैठकीबाबत काहीच ठरले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

छत्तीसगड-मध्य प्रदेशमध्ये भाजपचा पराभव होणार

ममता बॅनर्जी यांनी अहंकार, तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या भाजपच्या राजकारणाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन करत भाजपविरोधात मतदान न करण्याची मोहीम चालवावी असे त्यांनी म्हटले. आगामी काही महिन्यातच छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. त्यातही भाजपचा पराभव होणार असल्याचा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Bangladesh Crisis : बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा वणवा, बॉम्बस्फोट अन् जाळपोळ; पंतप्रधान तारिक रहमान यांचे भारताकडे बोट, मोठा आरोप
बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा वणवा, बॉम्बस्फोट अन् जाळपोळ; पंतप्रधान तारिक रहमान यांचे भारताकडे बोट, मोठा आरोप
धक्कादायक! दारुमुळं अनेक कुटुंबं उद्ध्वस्त, मणिपूरमध्ये आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 181 जणावर उपचार सुरु 
धक्कादायक! दारुमुळं अनेक कुटुंबं उद्ध्वस्त, मणिपूरमध्ये आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 181 जणावर उपचार सुरु 
Rajasthan Panchayat Elections : राजस्थान जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची लाट, 37 पैकी 27 जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता,राजधानी जयपूरमध्येही भाजपचा पराभव
काँग्रेसची राजस्थानात लाट, जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव, मुख्यमंत्री शर्मांना धक्का 

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget