नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात तृणमूल काँग्रेसने राष्ट्रपतीभवनावर मोर्चा काढला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा निघाला. महत्त्वाचं म्हणजे या मोर्चात सत्ताधारी शिवसेनेच्या खासदारांनीही सहभाग घेतला.


त्यांच्यासोबत आम आदमी पार्टीचे खासदारही मोर्चात होते.

शिवसेनेचे खासदार आनंदाराव अडसूळ, चंद्रकांत खैरै, गजानन कीर्तीवर आणि अरविंद सावंत या मोर्चात सहभागी झाले. नोटाबंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

तत्पूर्वी, नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात तृणमूलकडून संसद भवन परिसरात निदर्शनं करण्यात आली. अंगावर काळी शाल घेऊन हे निदर्शन करण्यात आली.