Malaria Vaccine : एकीकडे जगभरात कोरोनावरील लसीकरण वेगात सुरू असताना आता आणखी एका जीवघेण्या आजारावर तयार करण्यात आली आहे. मलेरिया (Malaria) या आजारावर लस उपलब्ध झाली आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी मलेरियाविरोधी लस R21/Matrix-M चा बूस्टर डोस (R21/Matrix-M मलेरिया लस) दिल्यानंतर लस घेणाऱ्यांवर केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील संशोधनाचा अहवाल शेअर केले आहेत. मलेरियावरील R21/Matrix-M ही लस मलेरिया रोखण्यासाठी प्रभावी ठरेल. त्यासाठी या लसीच्या पहिले तीन डोस आणि त्यानंतर एक वर्षानंतर बूस्टर डोस घेणं गरजेचं आहे. ही लस मलेरिया रोगापासून 70 ते 80 टक्के संरक्षण देण्यास सक्षम आहे. 'द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात ही माहिती देण्यात आली आहे. चाचणीनंतर या लसीला परवानगी मिळाल्यास मलेरिया सारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळेल.
सीरम इन्स्टिट्यूटकडे लस बनवण्याची परवानगी
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ला मलेरियावरील लस तयार करण्याचा परवाना मिळाला आहे. ही लस 12 महिन्यांपर्यंत मलेरियापासून 77 टक्के संरक्षण देण्यासाठी प्रभावी असल्याचे आढळून आलं आहे. 2021 मध्ये पूर्व आफ्रिकेतील मुलांवर केलेल्या संशोधनात ही माहिती समोर आली आहे. नव्याने केलेल्या अभ्यासात संशोधकांना असे आढळलं आहे की, R21/Matrix-M चे तीनही प्रारंभिक डोस जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मलेरिया लस तंत्रज्ञान रोडमॅप लक्ष्य पूर्ण केल्यानंतर एक बूस्टर डोस प्रशासित केले गेले, ज्यासाठी किमान 75 टक्के लसी आवश्यक आहे. प्रभावी असणे महत्वाचे आहे.
काँगोमधील 450 मुलांचा संशोधनात समावेश
ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या या संशोधनात बुर्किना फासोमधील 5 ते 17 महिने वयोगटातील 450 मुलांचा समावेश होता. या मुलांची तीन गटात विभागणी करण्यात आली होती. पहिल्या दोन गटांमधील 409 मुलांना मलेरियाविरोधी लसीचा बूस्टर डोस देण्यात आला. तर तिसऱ्या गटातील मुलांच्या रेबीज प्रतिबंधासाठी प्रभावी लस देण्यात आली. सर्व लसी जून 2020 मध्ये देण्यात आल्या. यावेळी मलेरियाच्या प्रादुर्भावा कमी होता. संशोधनात असं आढळलं आहे की, मलेरियाविरोधी लसीचा बूस्टर डोस घेतलेल्या मुलांमध्ये 12 महिन्यांनंतरही मलेरिया रोगाविरूद्ध 70 ते 80 टक्के प्रतिकारशक्ती असल्याचं आढळून आलं.
लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी चांगले परिणाम
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, मलेरिया प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस घेतल्याच्या 28 दिवसांनंतर संशोधनात सहभागी मुलांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीची पातळी सुरुवातीच्या डोसमध्ये दिलेल्या पातळीसारखीच होती. बूस्टर डोसनंतर दिल्यानंतर मुलांच्या शरीरावर कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसून आले नाहीत, तर शरीरातील अँटीबॉडीज वाढल्याचं पाहायला मिळालं.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील या संशोधनाचे प्रमुख संशोधक हलीडू टिंटो यांनी सांगितलं की, 'लसीच्या फक्त एका बूस्टर डोसने पुन्हा एकदा एवढी उच्च प्रतिकारशक्ती विकसित होताना पाहणं आश्चर्यकारक आहे. आम्ही सध्या मोठ्या प्रमाणावर चाचण्यांची तिसरी फेरी करुन अधिक निरीक्षण नोंदवणार आहोत, जेणेकरून पुढील वर्षी लस व्यापक वापरासाठी परवाना मिळू शकेल.'