Coronavirus Cases Today in India : एकीकडे देशात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. आज गणपती विसर्जनाचा उत्साह आहे. तर दुसरीकडे एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. देशात गुरुवारी दिवसभरात 6093 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 31 रुग्णांचा मृत्यू आहे. त्याआधी बुधवारी दिवसभरात 6395 नवे कोरोनाबाधित आढळले होते. यामध्ये 302 रुग्णांची घट झाल्याचं दिसत आहे. तर देशात मागील 24 तासांत 31 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


आतापर्यंत 5 लाख 28 हजारा 121 रुग्णांचा मृत्यू


देशात 5 लाख 28 हजारा 121 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे जीव गमावला आहे. दिवसभरात आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे, ही एक दिलासादायक बाब आहे. गेल्या 24 तासांत देशात 6 हजार 768 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्यी देखील कमी झाली आहे. सध्या देशात 49 हजार 636 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशातील दैनंदिन कोरोना सकारात्मकता दर 1.93 टक्के आहे. देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.11 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.7 टक्के आहे.






मुंबईत गुरुवारी 290 रुग्णांची नोंद


मुंबईत 290 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र होतं. मात्र पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गुरुवारी 270 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11 लाख 25 हजार 379 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.1 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,716 झाली आहे. सध्या मुंबईत 2,236 रुग्ण आहेत. 


महाराष्ट्रात सक्रिय रुग्णसंख्या सात हजारावर


राज्यात गुरूवारी 1076 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1031 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98 टक्क्यांवर आले आहे. राज्यात आतापर्यंत 79 लाख 53 हजार 80 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात  सहा कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.