Anand Mahindra : महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे एक उत्साही ट्विटर युझर आहेत, ते अनेकदा काही मनोरंजक पोस्ट, व्हिडिओ आणि विचार शेअर करतात. देशाला नवीन राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू सारख्या सशक्त महिला मिळाल्या आहे, आनंद महिंद्रांनी त्यांच्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. आनंद महिंद्रांनी राष्ट्रपतींच्या अनुकरणीय धैर्याचे आणि सेवेतील वचनबद्धतेचे कौतुक केले. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या प्रेरणास्थान असल्याचे वर्णन केले.


भारतासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण...
आनंद महिंद्रा यांनी डीडी न्यूजचे एक ट्विट रिट्विट केले, ज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय सलामी घेतल्याचं दिसत आहे, यावेळी महिंद्रा यांनी इंग्रजीमध्ये एक कॅप्शन लिहिले की, "Forward to your #MondayMotivation सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ती एक क धैर्याची व्यक्ती आहे आणि सेवा करण्याची वचनबद्धता आहे. त्यांच्या आंतरिक शक्तीने त्यांना जीवनाने दिलेल्या सर्व आव्हानांचा सामना करण्यास सक्षम केले आहे. मी त्याला अभिवादन करतो. भारतासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण."


 






 


द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती होणे ही अभिमानाची बाब


आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटला सुमारे 1800 लाईक्स मिळाले आहेत, तर 152 यूजर्सनी या पोस्टला रिट्विटही केले आहे. या पोस्टवर यूजर्सकडून अनेक कमेंट्सही आल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, "या महिलेला सलाम" दुसऱ्या यूजरने लिहिले की, "हा अभिमानाचा क्षण आहे."


द्रौपदी मुर्मू 25 जुलै 2022 पासून भारताच्या 15व्या आणि विद्यमान राष्ट्रपती बनल्या आहेत. राष्ट्रपती मुर्मू हे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सदस्य आहेत आणि भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या आदिवासी, अनुसूचित जमाती समुदायातील प्रथम व्यक्ती आहेत.