एक्स्प्लोर

Gujarat Drugs Case : ठाण्याच्या भाजीविक्रेत्याला गुजरातमध्ये 350 कोटींच्या ड्रग्जसह अटक, पाकिस्तानातून तस्करी

Gujarat Drugs Case : सज्जाद हा ठाण्यातील मुंब्र्याचा रहिवासी आहे. सज्जाद हा भाजीपाल्याचा विक्रेता असल्याचं समोर आलं आहे.  महाराष्ट्र कनेक्शन लागल्यामुळे हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. 

Gujarat Drugs Case : एकीकडे ड्रग्ज प्रकरणावरुन गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण गाजतंय. ड्रग्जच्या नावाखाली महाराष्ट्राला बदनाम करण्याचा घाट घातल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतोय. महाराष्ट्रामध्ये ड्रग्जवरुन रणकंद सुरु असतानाच  गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्जचा मोठा साठा हस्तगत करण्यात आलाय. गुजरातमधील द्वारकाच्या खंभालिया परिसरात तब्बल साडे तीनशे कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. ज्यात हेरॉईन आणि एमडी ड्रग्जचा समावेश आहे. यापूर्वी गुजरातमधील मुंद्रा बंदरावर जवळपास तीन हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं.

पाकिस्तानमधून तस्करी, तीन जणांना अटक -
धक्कादायक बाब म्हणजे या ड्रग्जची पाकिस्तानातून तस्करी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी गुजरात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. सज्जाद घोसी, सलीम कारा आणि अलीभाई कारा या तिघांना गुजरात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यातील सज्जाद हा ठाण्यातील मुंब्र्याचा रहिवासी आहे. सज्जाद हा भाजीपाल्याचा विक्रेता असल्याचं समोर आलं आहे.  महाराष्ट्र कनेक्शन लागल्यामुळे हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. 

350 कोटींचं ड्रग्ज -
गुजरातमधील स्थानिक पोलिसांनी जवळपास 16 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. हेरॉईनसोबत 66 किलो मेफेड्रोन ड्रग्जही पकडण्यात आलं आहे. याची किंमत जवळपास 350 कोटी रुपये असल्याचं समजतेय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ड्रग्ज पाकिस्तानमधून समुद्राच्या मार्गे येत होतं. याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड मारत ड्रग्ज जप्त केलं. 

सापळा रचून अटक -
स्थानिक गुन्हे शाखेला एक व्यक्ती ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. वांकानेर रस्त्यावर सापळा रचत अटक करण्यात आलं. या आरोपीकडून दोन बॅग जप्त करण्यात आल्या. यामध्ये एका बॅगमध्ये 15 किलो तर दुसऱ्या बॅगमध्ये 45 किलो ड्रग्ज होतं. 

कोणतं ड्रग्ज –
स्थानिक पोलिसांनी आणि गुन्हे शाखेनं केलेल्या या कारवाईत विविध प्रकराचं ड्रग्ज होतं. शहजाद याच्याकडून 6.168 किलो मेथामफेटामायन (एमडी ड्रग) आणि 11.48 किलो हेरॉईनचा समावेश आहे. याची एकूण किंमत 88,25,50,000 इतकी असल्याचं समजतेय. शहजादशिवाय सलीम कारा आणि अली कारा यांच्याकडूनही ड्रग्जची 47 पॅकेट्स जप्त करण्यात आली. याची किंमत 235 कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे.  88 आणि 235 असं जवळपास 350 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. या आरोपींद्वारे मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होईल, असं गृह राज्य मंत्री हर्ष संघवी यांनी सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
Embed widget