एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्र ऑनलाईन फसवणुकीत पुढे, देशात 179 कोटींची लूट
एक लाखांपेक्षा जास्त किमतीची फसवणूक झाल्याची तब्बल 380 प्रकरणं एकट्या महाराष्ट्रात समोर आली आहेत. ऑनलाईन चोरट्यांनी 12.10 कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे.
नवी दिल्ली : ऑनलाईन व्यवहारांसाठी सरकारतर्फे प्रोत्साहन दिलं जात आहे, मात्र ऑनलाईन फसवणूक होण्याची तब्बल 25 हजार 800 प्रकरणं देशभरात समोर आली आहेत. विशेष म्हणजे ऑनलाईन फसवणुकीत महाराष्ट्राचा क्रमांक देशात पहिला लागला आहे.
क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगसंदर्भात तब्बल 179 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. वर्षभरातील ( 21 डिसेंबर 2017 पर्यंत ) ऑनलाईन फसवणुकीची माहिती शुक्रवारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत दिली.
रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यात ऑनलाईन फ्रॉडची 10 हजार 220 प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये 111.85 कोटी रुपयांचा समावेश आहे.
काळजीची गोष्ट म्हणजे, एक लाखांपेक्षा जास्त किमतीची फसवणूक झाल्याची तब्बल 380 प्रकरणं एकट्या महाराष्ट्रात समोर आली आहेत. ऑनलाईन चोरट्यांनी 12.10 कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे.
महाराष्ट्रानंतर एक लाखांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा सर्वाधिक फटका हरियाणाला बसला आहे. हरियाणात 238 प्रकरणांची नोंद झाली असून आठ कोटींची रक्कम लुबाडण्यात आली आहे. त्यानंतर कर्नाटक (221 प्रकरणं, 9.16 कोटी ), तामिळनाडू (208 प्रकरणं, 4.38 कोटी) आणि दिल्ली (156 प्रकरणं, 3.43 कोटी) या राज्यांचा क्रमांक येतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement