Maharashtra Political Crisis  : 50 आमदारांनी माझी शिवसेनेचा गटनेता म्हणून निवड केली आहे. मुंबईत गेल्यानंतर पुढील रणनीती ठरवणार आहे. त्यांतर मी परत गोव्याला येणार आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी गोवा विमातळावर पोहोचल्यावर दिली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. गोव्यात शिंदे गटाची बैठक संपली असून एकनाथ शिंदे मुंबईला रवाना झाले आहेत. राज्यपालांना भेटण्यासाठी मुंबईला जात असल्याचं एकनाथ शिंदे यांनी गोव्यातील हॉटेलमधून निघताना सांगितलं. शिंदे गटातून केवळ एकनाथ शिंदे एकटेच मुंबईला येणार आहेत. त्यांच्यासोबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण आहेत. 


शिंदे गटातील आमदार मुक्कामाला असलेल्या हॉटेलपासून गोवा विमानतळ ३० किमी अंतरावर आहे. इथून फाईव्ह सीटर चार्टर विमानाने ते गोव्यातून मुंबईला येणार आहेत. तर मुंबई विमानतळावर हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आलं आहे. इथून थेट राजभवनला जाणार असल्याचं कळतं. पण मुंबईत सध्या पाऊस सुरु असल्याने ते रस्ते मार्गानेच राजभवनवर पोहोचतील असं कळतं.


गुवाहाटीहून गोव्यात आलेल्या शिंदे गटाच्या आमदारांची आज सकाळी अकरा वाजता बैठक घेण्यात आली. जवळपास तासभर चाललेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बाजू ऐकून घेतली. मी राज्यपालांची भेट घेण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. दुपारी अडीच वाजेपर्यंत राज्यपालांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांची भाजप नेत्यांसोबतही बैठक होणार असल्याचं कळतं. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा होणार असल्याचं समजतं.


शिंदे गटातील महत्त्वाचे नेते देखील मुंबईत दाखल होतील. त्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यावर उर्वरित आमदार मुंबईत पोहोचतील अशी माहिती सध्या मिळत आहे. पुढचा निर्णय लवकरच कळवू असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.


शिवसेनेचा गटनेता म्हणून माझी निवड : एकनाथ शिंदे
50 आमदारांनी माझी शिवसेनेचा गटनेता म्हणून निवड केली आहे. मुंबईत गेल्यानंतर पुढील रणनीती ठरवणार आहे. त्यांतर मी परत गोव्याला येणार आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी गोवा विमातळावर पोहोचल्यावर दिली. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला याचा आम्हाला आनंद नाही. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात जे काही प्रश्न,अडचणी होत्या, चांगले-वाईट अनुभव आले यामधून आपण बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाचा विचार पुढे घेऊन जावा, अशी 50 आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी होती. यावर वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. आम्हाला कोणालाही आनंद झालेला नाही. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कालही आदर होता, आजही आहे. नवं सरकार कधी स्थापन होईल या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज्यपालांना  भेटण्यासाठी मुंबईला जात आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे. त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल."


Eknath Shind left for Mumbai From Goa : एकनाथ शिंदेंसोबत BJP MLA Ravindra Chavan गोव्यातून रवाना



कोणती आणि किती मंत्रीपदाबाबत चर्चा नाही : एकनाथ शिंदे 


Eknath Shinde on Maharashtra Cabinet Ministry : एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तत्पूर्वी आता भाजप आणि शिवसेना शिंदेगटाचं सरकार आल्यानंतर मंत्रीमंडळ कसं असेल याची आता चर्चा सुरु झाली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. शिंदे यांनी म्हटलं आहे की, भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.