Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूचा फैलाव थांबताना दिसत नाहीय. कोरोना संसर्गाचा आलेख वाढतानाच दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढून एक लाखांच्या पुढे पोहोचली आहे. ही चिंताजनक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 819 नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात 39 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या 1 लाख 4 हजार 555 सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत.


देशात एक लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण
देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 555 इतकी झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 13 हजार 827 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.






कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ


कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. आदल्या दिवशी कोरोनाचे 14 हजार 506 नवीन रुग्ण आढळले होते. यादरम्यान कोरोनाची लागण झालेल्या 30 जणांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाखांच्या पुढे पोहोचली आहे.


दैनंदिन सकारात्मकता दर 4.16 टक्क्यांवर पोहोचला 
बुधवारी दिवसभरात 13 हजार 827 रुग्ण कोरोनातून बरेही झाले आहेत. देशाचा दैनंदिन सकारात्मकता दर 4.16 टक्के झाला आहे. देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 5 लाख 25 हजार 116 वर पोहोचली आहे.


मुंबईत बुधवारी 1504 रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत बुधवारी 1645 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 79 हजार 774 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 609 झाली आहे. सध्या मुंबईत 11,844 रुग्ण आहेत.


महाराष्ट्रात 3957 नवे रुग्ण, तर 3696 रुग्ण कोरोनामुक्त
बुधवारी दिवसभरात महाराष्ट्रात 3957 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात एकूण 3696 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या