Delhi Government : दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सराकारनं मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक गावच्या विकासासाठी सरकारनं एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. प्रत्येक विधानसभेत जेवढी गावं आहेत, त्या गावांच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करण्याचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांनी घेतला आहे. विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावच्या विकासासाठी 2 कोटी रुपये देण्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील मंत्रीमंडळात मंजूर करण्यात आला आहे.
विकासकामांसाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध होणार
आता गावांनी मिळून मागणी केल्यास त्यांना विकासासाठी निधी देण्यात येणार आहे. दिल्लीतील गावांचा विकास करण्यासाठी आम्ही काही वर्षांपूर्वी प्रत्येक गावात 2 कोटी रुपयांची विकासकामे केली जातील अशी योजना आणली होती. तिथले लोक जी कामे सांगतील ती कामं यामाध्यमातून करण्यात येतील. रस्ता, पाणी यासह गावातील विविध प्रकारची काम या विकासनिधीतून केली जामार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
विविध गावातून जाणाऱ्या रस्त्याचीही देखभाल होणार
एखादा रस्ता जर विविध गावातून जात असेल तर त्याची देखल कोणी करायची असा प्रश्न निर्माण होत होता. समजा एखादा रस्ता जर तीन गावातून जात आहे तर त्या रस्त्याचा या योजनेत समावेश करण्याची अडचण होती. मात्र, आता ती अडचण दूर केली जाणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. आता विधानसभेत किती गावे आहेत, त्या सर्व गावांवर एकूण बजेट कसे खर्च केले जाणार याचीही चर्चा सुरु आहे. तीन गावांनी मिळून मागणी केल्यास त्यांना अर्थसंकल्प दिला जाईल. कोणत्याही एका गावात गरज भासल्यास त्या गावाला पैसे दिले जातील असी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला होता. त्या योजनेचा कालावधी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यानंत आता दिल्ली सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं ठरवले आहे की प्रत्येक गावात 2 कोटी रुपयांची विकासकामे केली जातील. लोक काय करायचे ते सांगतील.