Maharashtra Live Updates 28th May 2023 : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
वंचित बहुजन आघाडी पक्षाचे मुंबई युवक अध्यक्ष परमेश्वर रणसूर यांच्यावर मुंबईतील दादर परिसरात चार अज्ञातांनी चाकू आणि रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात परमेश्वर व्यतिरिक्त प्रभाग अध्यक्ष गौतम हराळ हे देखील जखमी झाले आहेत. दोघांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मुंबईतील भोईवाडा पोलिसांनी चार अज्ञातांविरुद्ध भादंवि कलम 307, 326 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
Wrestlers in Police Custody : दिल्लीमध्ये सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात गोंधळ सुरु आहे. पोलिसांनी आता आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर येथून नवीन संसदेसमोर महापंचायत भरवायला निघालेल्या पैलवानांना पोलिसांनी अडवलं. त्यानंतर पोलीस आणि आंदोलक पैलवानांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी पैलवानांना ताब्यात घेतलं.
Belgaon News : बेळगावात चाललेली शिवजयंती चित्ररथ मिरवणूक तब्बल साडे बारा तास चालली. शनिवारी (27 मे) सायंकाळी सहा वाजता सुरु झालेली चित्ररथ मिरवणूक रविवारी (28 मे) सकाळी साडे सहा वाजता संपली. मिरवणूक पाहण्यासाठी संपूर्ण रात्र लोकांनी गर्दी केली होती. मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, झांज पथक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगावर आधारित जिवंत देखावे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. लोकांना बसून मिरवणूक पाहता यावी म्हणून महानगरपालिकेने धर्मवीर संभाजी चौक इथे गॅलरी उभारली होती. पोलिसांनी डॉल्बीवर बंदी घातल्याने मिरवणुकीतील दणदणाट कमी झाला आणि ध्वनी प्रदूषण टळले.
Mumbai Crime : मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
गुंदिवलीत राहणाऱ्या एका सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.
या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मुलीच्या पालकांनी काल संध्याकाळी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अंधेरी पोलिसांनी त्या नराधम तरुणाला अटक केली आहे.
नितीन विठ्ठल खंदारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अंधेरी पोलिसांनी त्यांच्यावर रेपसह POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहेत.
मुंबईच्या कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली.
आज सकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी ही गोळीबाराची घटना घडली
या घटनेत एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला
गोळीबार नेमका कशावरुन झाला हे मात्र अद्याप समजलेलं नाही
गोळीबार करुन आरोपी फरार झाला आहे
घटनास्थळावर कांदिवली पोलीस पोहोचले आहेत.
कांदिवली लालजी पाडा परिसरात मागील सहा महिन्यांतील गोळीबाराची ही दुसरी घटना
गोळीबाराच्या घटनेमुळे कांदिवली लालजीपाडा परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
निती आयोगाच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार, आठ राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला गैरहजर
नवी दिल्लीत (New Delhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची आठवी बैठक (NITI Aayog meeting) शनिवारी 27 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. 'विकसित भारत @2047: रोल ऑफ टीम इंडिया' हा यंदाच्या बैठकीचा विषय आहे. परंतु या बैठकीवर आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आता या मुख्यमंत्र्यांना त्यांनी टाकलेला बहिष्कार हा महागात पडू शकतो असं सांगितलं जात आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांकडून निती आयोगाच्या बैठकीवर जो बहिष्कार टाकण्यात आला तो त्यांनी राज्याच्या विकासावर टाकला आहे असं म्हटलं जात आहे. तसेच या बैठकीत जवळपास 100 मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, त्यामुळे जी राज्यं या मुद्द्यांचं प्रतिनिधित्व करु शकणार नाहीत ती राज्य पराभवाच्या दिशेने वाटचाल करतील.
ABP C Voter Survey: पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी की राहुल गांधी? सर्वेक्षणात समोर आला लोकांचा कौल
ABP C Voter Survey: केंद्रात मोदी सरकारने (Modi Government) त्यांच्या नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या नऊ वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या कामांचा आढावा भाजपकडून (BJP) करण्यात आला तर विरोधकांकडून यावर चांगलीच टीका देखील करण्यात आली. आता एका वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुकाचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती सत्ता जाणार का? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एका बाजूला विरोधी पक्षांकडून एकजूट निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, तर भाजपाकडून केंद्रात सत्तेची हॅट्ट्रिक मारण्याची तयारी सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजसाठी सी-वोटरने एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणामध्ये पंतप्रधान पदाच्या पसंतीचा सवाल करण्यात आला होता. पंतप्रधान पदासाठी भाजपचे नरेंद्र मोदी की काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी यापैकी कोणाला मतदान कराल? हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना 56 टक्के लोकांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती दर्शवली आहे. तर 35 टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दर्शवली आहे. तर पाच टक्के लोकांनी कोणालाही पसंती दर्शवली नाही आहे. चार टक्के लोकांनी निश्चित सांगता येणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकानंतर देशात पुढील पंतप्रधान कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -