भोपाळ : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुग्रामवरुन चेन्नईला आयफोन घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली. दरोडेखोरांनी जवळपास 11 कोटी रुपयांचे एकूण 1500 आयफोन पळवून नेले. ही घटना 15 ऑगस्टला घडली होती. ट्रक चालकानं तक्रार देण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका पोलिसाला निलंबित करण्यात आलं आहे. तर, इतर दोन पोलिसांची बदली करण्यात आली आहे. 


सागर जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस निरीक्षक संजय उईके यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे.  15 ऑगस्टला चालकाला गुंगीचं औषध टाकलेला पदार्थ खायला देऊन त्याचं तोंड बंद करुन ट्रक लुटण्यात आल होता. दरोडा टाकणाऱ्यांनी चालकाला बांधून ट्रकच्या केबिनमध्ये टाकून दिलं होतं. या ट्रकमध्ये एकूण 4 हजार आयफोन होते, त्यापैकी 1500 आयफोन गायब होते. चालकाला जाग आली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. 


संजय उईके यांनी 11 कोटी रुपयांचे 1500 आयफोन चोरीला गेल्याच्या दाव्याची पडताळणी करत असल्याचं म्हणाले. या फोनची निर्मिती करणाऱ्या अॅपल कंपनीनं अद्याप पोलिसांसोबत संपर्क केलेला नाही. जिल्हा मुख्यालयापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ट्रकचं व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं जात आहे. हरियाणाच्या गुरुग्राम येथून कंटेनरमधून  चेन्नईला पाठवले जात होते. ट्रक ज्यावेळी लुटला गेला त्याची सुरुवात नरसिंहपूर जिल्ह्यातून झाली होती. 


 
सागर विभागाचे पोलीस महासंचालक प्रमोद वर्मा यांनी प्रकरणात बेजबाबदारपणा दाखवल्याबद्दल प्रभारी पोलीस निरीक्षक भागचंद उइके आणि सहायक पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र पांडे आणि हेड कॉन्स्टेबल राजेश पांडे यांच्यावर कारवाई केली. यापैकी राजेश पांडे यांचं निलंबन करण्यात आलं. 
  
सागर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी आरोपींना पकडण्यासाठी आठ पथकं बनवल्याची माहिती दिली. या प्रकरणी सुरक्षा रक्षकावर देखील संशय असल्याचं स्पष्ट झालं आहे. सुरक्षारक्षकासोबत संपर्क होत नसून,त्याचं पोलीस वेरिफिकेशन न करता त्याला कामावर ठेवलं गेलं होतं. सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु करण्यात आली आहे. 


इतर बातम्या :



Sujay Vikhe-Patil : नितेश राणे काल म्हणाले मी हिंदूंचा गब्बर, आज सुजय विखे म्हणतात, नगरमध्ये जाती-धर्मावरुन द्वेष पसरवाल तर....