Sujay Vikhe Patil अहमदनगर : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी काल अहमदनगर (Ahmednagar) येथे भाषणावेळी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मी चालायला लागलो तर लोकं दारं बंद करतात, मी हिंदूंचा गब्बर आहे, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलं होतं. महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या (Sakal Hindu Samaj) वतीने अहमदनगरमध्ये (Ahmednagar)नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, याच मुद्यावरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी नितेश राणे यांच्यासह आयोजक दिगंबर गेंट्याल यांच्यावर अहमदनगर येथे गुन्हा देखील दाखल झाला होता. अशातच आता या प्रकरणात भाजप नेते आणि अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी उडी घेत  नितेश राणेंना घरचा आहेर दिला आहे. 


सुजय विखे यांनी नितेश राणेंना खडे बोल चुनावले असून मतदारसंघात जाती धर्मावरून तेढ निर्माण करत द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा सुजय विखे यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत नगरमधील पराभवानंतर सुजय विखे यांचा राहता मतदारसंघात  सक्रिय झाले आहे. दरम्यान, या प्रचार दौऱ्यावर असताना शिर्डीतील एका सोहळ्यात विखें यांनी जातीच्या राजकारणावर भाष्य करत भाजप नेते नितेश राणे यांना खडे बोल सुनावले आहे. 


मतदारसंघात जाती धर्मावर द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी- सुजय विखे


शिर्डीत कोणीही असुरक्षित नाही. या मतदारसंघात हिंदू-मुस्लिम ऐक्य आहे आणि ते कायम राहिले पाहिजे. अनेक वर्षापासून आपण एकोप्याने राहतो आहे. त्यामुळे जाती धर्म पाहून आम्ही काम करत नाही. जर कोणाला जातिवाद करायचा असेल तर आम्हाला सांगा. आम्ही सुद्धा अर्ज स्वीकारताना जात धर्म पाहू.  तीस वर्षात आम्ही कधीही जात विचारली नाही. मात्र हल्ली जातीचे विष पसरवणारे लोक जनतेला आता नकोय. याच शिर्डीमध्ये साईबाबांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आणि तो संदेश आपल्याला भविष्यात देशभराला द्यायचा आहे. आज जनतेच्या गरजा महत्त्वाच्या आहेत.  तो कोण आहे, कोणत्या जातीचा आहे हे देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचं नसल्याचे भाष्य सुजय विखे यांनी बोलताना केलं आहे. ते शिर्डी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 


इतर महत्वाच्या बातम्या