भोपाळः योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या वस्तू लवकरच शीधा वाटप केंद्रांमध्येही मिळतील, अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांनी केली आहे. यासाठी सहकार आणि अन्न आणि औषध विभागला लवकरात लवकर योजना आखण्याचे आदेश दिले आहेत.


शीधा वाटप केंद्र केवळ गहू आणि तांदूळ यांच्यापुरतीत मर्यादित राहू नयेत. ही केंद्र बहुद्देशीय बनण्याची गरज आहे. त्यामुळे पतंजलीच्या वस्तूही आता शीधा वाटप केंद्रातच मिळतील, अशी घोषणा शिवराज सिंह यांनी केली आहे. त्यामुळे लवकरच मध्य प्रदेशात पतंजलीच्या वस्तू शीधा वाटप केंद्रात मिळतील.


शिवराज सिंहांच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध

शिवराज सिंह यांनी ही घोषणा केल्यानंतर राज्यात त्याच्याविषयी संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. या निर्णयाला काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. कॉर्पोरेट क्षेत्राशी वैयक्तिक संबंध वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ही चाल आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.