नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना 16 मार्च रोजी सभागृहात विश्वासमत सादर करण्यासाठी सांगितलंय. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर लगेच कमलनाथ यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, 16 मार्चपासून मध्य प्रदेशचे अधिवेशन सुरु होणार आहे.


मध्य प्रदेशमध्ये विधानसभा अध्यक्षांनी 6 आमदारांचा राजीनामा स्वीकारलाय. हे सर्व आमदार ज्योतिरादित्य सिंधियांचे समर्थक आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्यास नकार दिला. हे सर्व सरकारमध्ये मंत्री होते. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शिफारशीनंतर कालच राज्यपालांनी पदावरुन त्यांची हकालपट्टी केलीय.

राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ आणि विधानसभा अध्यक्ष यांना पत्र पाठवून सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे असे सांगितले आहे. राज्यपालांनी पत्रात स्पष्ट लिहिले आहे की, सभागृहात सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे घटनात्मक आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी सरकारने बहुमत सिद्ध करणे आवश्यक आहे.

Jyotiraditya Scindia | ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजप प्रवेश; कमलनाथ सरकारचं काय होणार? | ABP Majha


सीएम कमलनाथ आणि सभापतींना लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी आदेश दिले आहेत की 16 मार्चपासून अर्थसंकल्प सुरू होणार आहे. त्यामुळे अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणानंतर बहुमत चाचणी घेण्यात येईल. या चाचणीचे चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी हा आदेश भाजपच्या शिष्टमंडळाला भेट दिल्यानंतर हा आदेश दिला आहे. या भेटीमध्ये फ्लोर टेस्टची मागणी करण्यात आली होती.

सभागृहात एकूण आमदारांची संख्या 206 असून आणि बहुमतासाठी 104 आमदारांना पाठिंबा गरजेचा आहे. परंतु या परिस्थितीत कॉंग्रेसकडे केवळ 92 आमदार शिल्लक राहतील आणि बिगर-भाजपा आणि बिगर-कॉंग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्यानंतर ही संख्या 99 वर पोहचेली. अशा परिस्थितीत भाजप सहजपणे सरकार स्थापन करेल, कारण विधानसभेत भाजपाला 107 आमदारांचा पाठिंबा आहे.

संबंधित बातम्या :

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार धोक्यात, ज्योतिरादित्य शिंदेंसह काँग्रेसच्या 22 आमदारांचा राजीनामा

ऑपरेशन लोटस मध्य प्रदेशमध्ये सक्रीय; मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतले सर्व मंत्र्यांचे राजीनामे