नवी दिल्ली : एकीकडे देशभर धुळवडीनिमित्त रंग उधळले जात असताना, भाजपच्या मध्यप्रदेशातल्या ऑपरेशन लोटसमुळं काँग्रेसचा बेरंग झालाय. राहुल ब्रिगेडमधले महत्त्वाचे नेते समजले जाणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिलाय. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार आहेत. तर तिकडे बंगळुरु गाठणाऱ्या मध्य प्रदेशातल्या 22 काँग्रेस आमदारांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंतर कमलनाथ यांचं सरकार अल्पमतात आलं आहे.


कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत कमलनाथ सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झालेल्या या बैठकीत केवळ कॉंग्रेसचे 88 आमदार सहभागी झाले होते. म्हणजेच या बैठकीतून आणखी चार कॉंग्रेसचे आमदार उपस्थित नव्हते. कॉंग्रेसची बैठक सुमारे दोन तास चालली होती.


कॉंग्रेसच्या बैठकीत 92 आमदार उपस्थित होते. त्यापैकी 4 आमदार अपक्ष आहेत. कॉंग्रेसचे एकूण 114 आमदार होते. त्यापैकी 22 आमदारांनी राजीनामा दिला असून चार आमदार गायब आहे.


 कमलनाथ आणि सिंधिया यांच्यात कलह इतका वाढला की ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला. सिंधिया मंगळवारी सकाळी अमित शहा यांना भेटायला गेला आणि त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. एक तासाच्या बैठकीनंतर सिंधिया बाहेर आले. सिंधिया भाजपमध्ये सामील होतील आणि त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना केंद्रात मंत्री केले जाईल अशी माहिती समोर आली.





ज्योतिरादित्य यांनी जेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तेव्हा बंगळुरूमध्ये सिंधिया समर्थक 19 कॉंग्रेस आमदारांचे चेहरे समोर आले. यामध्ये कमलनाथ सरकारचे 6 मंत्री देखील होते. त्यानंतर सर्वांनी राजीनामा दिला. यानंतर कॉंग्रेसच्या आणखी दोन आमदारांनीही राजीनामा दिला. म्हणजेच कॉंग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिला आणि भाजप सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.


Jyotiraditya | ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा, शिंदे यांनी सोनिया गांधीकडे राजीनामा सोपवला




संबंधित बातम्या :