एक्स्प्लोर

शिवराज सरकारच्या वृत्तपत्रात 24 पैकी 23 पानांवर जाहिरात

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 24 पानांच्या सरकारी वृत्तपत्रामध्ये एक-दोन नव्हे तब्बल 23 पानांवर जाहिराती आहेत.

भोपाळ : मध्य प्रदेशचं शिवराज सिंह सरकार कसं प्रचारप्रेमी आहे, याचा प्रत्यय राजधानी भोपाळमधील एक मोठं सरकारी वर्तमानपत्र पाहिल्यावर येतो. 24 पानांच्या वृत्तपत्रामध्ये एक-दोन नव्हे तब्बल 23 पानांवर जाहिराती आहेत. जाहिरातींच्या माध्यमातून प्रचार मोहीम राबवण्यात शिवराज सरकारने शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत. वर्तमानपत्राच्या 23 पानांमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो छापण्यात आले आहेत. वर्तमानपत्रात जाहिरातींच्या रुपात छापण्यात आलेली ही सरकारी योजनांची माहिती पुस्तिकाच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सरकारी योजना बारगळल्यामुळे जाहिरातींच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन दिला जात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. गेल्या 13 वर्षांपासून शिवराज सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची स्वतःजवळ राखली आहे. गेल्या पाच वर्षात जाहिरात आणि विशेष कार्यक्रमांच्या प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियात तीन अब्ज 15 कोटी 43 लाख 55 हजार 232 रुपये खर्च करण्यात आले, अशी माहिती विधानसभेत जनसंपर्क मंत्र्यांनी काँग्रेस आमदार जीतू पटवारी यांना दिली. गेल्या तीन वर्षात जाहिरातींवर केवळ आठशे कोटी रुपये खर्च झाल्याचं जुलै 2017 मध्ये सरकारने सांगितलं होतं. शिवराज सरकार दीड लाख कोटी रुपयांच्या खर्चात बुडालेली असताना जाहिरातींवर ही उधळपट्टी केली जात आहे. गेल्या वर्षी नर्मदा यात्रेवर 24 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला होता, त्यापैकी मोठा भाग हा प्रचार-प्रसारावर उधळण्यात आला होता. निवडणुकांचं वर्ष आल्याने प्रचारप्रेमी सरकार जाहिरातींवर खर्च करताना काचकूच करणार नाही, हे तर साहजिक आहे. मात्र प्रचारापेक्षा शिवराज सिंहांच्या ब्रँडिंगवर अधिक खर्च होत असल्याचं दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget