(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MP By Election: मध्यप्रदेशात भाजपची जोरदार मुसंडी, मुख्यमंत्री शिवराज चौहान म्हणाले...
MP By Election Result Live : मध्यप्रदेश पोट निवडणुकीकडे देखील देशाचे लक्ष लागून आहे. 28 जागांसाठी निवडणूक झाली होती.निवडणूक आयोगाने 28 पैकी 28 जागांचे कल जारी केले आहेत. यात काँग्रेसला आठ जागांवर आघाडी आहे.
MP By Election Result Live : मध्यप्रदेश पोट निवडणुकीकडे देखील देशाचे लक्ष लागून आहे. 28 जागांसाठी निवडणूक झाली होती. निवडणूक आयोगाने 28 पैकी 28 जागांचे कल जारी केले आहेत. यात काँग्रेसला आठ जागांवर आघाडी आहे. तर भाजपनं 19 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळं भाजप म्हणजेच शिवराज सरकार मजबूत होण्याकडे वाटचाल करत आहेत. एका जागेवर बीएसपी आघाडीवर असल्याची माहिती आहे.
आतापर्यंतच्या कलांमध्ये 19 जागांवर आघाडी, या निकालानं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी निकाल पाहात असतानाची काही छायाचित्र देखील शेअर केली आहेत. राज्याच्या जनतेनं एकदा पुन्हा विकास आणि जनकल्याणासाठी संकल्प केलेल्या भाजपला मध्यप्रदेशची जबाबदारी सोपवली आहे.
राज्य की जनता ने एक बार फिर विकास और जनकल्याण के लिए संकल्पित @BJP4MP को मध्यप्रदेश की जिम्मेदारी सौंपने का निर्णय ले लिया है। यह स्पष्ट दिखाई दे रहा है।
प्रदेश विधानसभा के उपचुनाव के परिणाम को पार्टी के प्रदेश अध्यक्ष श्री @vdsharmabjp और साथियों के साथ देख रहा हूं। pic.twitter.com/yE4RiTG7mP — Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) November 10, 2020
मध्य प्रदेशात विधानसभेच्या 28 जागांसाठी घेण्यात आलेल्या पोट निवडणुकीचा निकाल मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारचं भविष्य ठरवणार आहेत. तर मध्य प्रदेशातील 25 जागांवर निवडून आलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली.
सध्याच्या निवडणुकीसाठी पूर्वीचे काँग्रेस आमदार आता भाजपकडून निवडणूक लढत आहेत. तर उरलेल्या तीन जागांवर निवडून आलेल्या आमदारांचं निधन झाल्यामुळे त्या ठिकाणी पोट निवडणुका घेण्यात आल्या होत्या. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 230 सदस्यांच्या विधानसभेच्या 28 जागांसाठी एकत्रच पोटनिवडणुका घेतल्या होत्या.