Petrol Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही स्थिर आहेत. राष्ट्रीय स्तरावर गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर बदलले आहेत. तेल कंपन्यांनी सकाळी सहा वाजता अपडेट जारी केले. त्याचबरोबर देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी नवी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.


देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. याशिवाय कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.


कच्च्या तेलाची किंमत


जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अस्थिर आहेत. बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.60 डॉलर प्रति बॅरल म्हणजेच, 0.90 टक्क्यांच्या वाढीसह 76.96 डॉलर प्रति बॅरलनं विकलं जात आहे. तसेच, WTI क्रूड 0.84 डॉलर प्रति बॅरल म्हणजेच, 1.17 टक्क्यांच्या वाढीसह 72.67 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. 


Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 



  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 

  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

  • छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 

  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर

  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर 


Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या


इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).