एक्स्प्लोर
लुधियानामध्ये शाळकरी मुलाच्या विकृतीचा कळस

लुधियाना: येथील एका 15 वर्षाच्या मुलाने त्यांच्याच शाळकरी मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या विकृत शाळकरी मुलाने 8 वर्षाच्या या चिमुकल्याचं काळीज कापून शाळेच्या पटांगणात फेकून दिलं. या अल्पवयीन आरोपीने दिपू नावाच्या मुलाचे सहा तुकडे केले आणि ते दोन गोणीत भरले. या गोण्या त्याने मोकळ्या मैदानात फेकून दिल्या. याप्रकरणी लुधियाना पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, आरोपीच्या कुटुंबियांनी अजून धक्कादायक जबाब दिला आहे. कुटुंबियांनी या 15 वर्षाच्या आरोपीला बऱ्याचदा प्राण्यांचं ताजं रक्त पिताना बघितलंय. तर कधी कधी हा मुलगा स्वत:च्याच शरीराचे लचके तोडायचा. इतकंच नाही तर त्याच्या मनात शाळेचा प्रचंड राग होता आणि म्हणूनच त्याने दिपूचं काळीज कापून ते शाळेत फेकल्याची माहिती स्वत: आरोपीनं पोलिसांना दिली.
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा






















