एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदी-राहुल गांधींच्या रोड शोला पोलिसांचा नकार

गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. या अलर्टमुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या रोड शोला परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती समोर येते आहे.

अहमदाबाद : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने (आयबी) वर्तवली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोला अहमदाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सुरुवातीला कायदा आणि सुव्यवस्था, तसंच ट्रॅफिकचं कारण देत रोड शो ला परवानगी नाकारल्याचं सांगण्यात आलं. मात्र, विधानसभा निवडणुकीदरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. या अलर्टमुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या रोड शोला परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती समोर येते आहे. गुप्तचर यंत्रणांकडून गुजरात पोलिसांना दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मोदी आणि राहुल गांधींसह बड्या राजकीय नेत्यांना देखील रोड शोला परवानगी न देण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. आयबीच्या सुत्रांच्या मते, अहमदाबादमध्ये 'लोन वोल्फ अटॅक' होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आजच्या रोड शोला परवानगी नाकारण्यात आली आहे. 'लोन वोल्फ अटॅक' म्हणजे काय? 'लोन वोल्फ अटॅक' हा कुणा एका दहशतावाद्याकडून केला जातो. यासाठी दहशतवादी गर्दीच्या ठिकाणांचा वापर करुन आपल्या टार्गेटवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या वाहनाचा वापर किंवा अफवा पसरवून देखील हल्ला केला जाऊ शकतो. नुकतंच स्पेनच्या बार्सिलोनामध्ये एक लोन वोल्फ अटॅक करण्यात आला होता. यामध्ये रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांना ट्रकनं चिरडण्यात आलं होतं. 14 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान दरम्यान, गुजरातमधील पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं असून आता दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानही 14 डिसेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी 68 टक्के मतदान झालं. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजप आणि काँग्रेसनं जोरदार प्रचार सुरु केला आहे. या प्रचारालाही अवघे काही तास बाक असताना अशाप्रकारे पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यानं कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीनं गुजरात पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. संबंधित बातम्या : सीडी बनवण्याच्या नादात भाजप जाहीरनामा विसरली : हार्दिक पटेल मोदींना 'नीच' म्हणणाऱ्या मणिशंकर अय्यरांवर काँग्रेसची तात्काळ कारवाई मोदी 'नीच', मणिशंकर अय्यर यांची जीभ घसरली, टीकेनंतर माफीनामा योगी गुजरातमध्ये, मोदी-शाहांची रॅली, प्रचार तोफा थंडावणार गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे ओपिनियन पोल एका ठिकाणी गुजरात निवडणुकीवर आतापर्यंत 500 कोटींचा सट्टा, कोण जिंकणार? मी नरेंद्रभाईसारखा नाही, माणूस आहे, चुकतो : राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधींचं गणित चुकलं ओपिनियन पोल : उत्तर गुजरातमध्ये भाजपला धक्का, कोण बाजी मारणार? ओपिनियन पोल : गुजरातमध्ये 'काँटे की टक्कर'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कारGadchiroli C60 Commando : नक्षल्यांचा खात्मा करणारी 'सी-60' आहे तरी कोण? Special ReportABP Majha Headlines : 08 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 26 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Chhaava :
"तो सीन डिलीट करा", छावा चित्रपटाच्या वादावरुन उदयनराजेंचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना फोन
Maharashtra Kesari 2025: पुण्याच्या भाग्यश्री फंडने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं, मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरलं
पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं
Astrology : आज प्रजासत्ताकदिनी बनले मोठे शुभ योग; 3 राशींना होणार याचा मोठा लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
आज प्रजासत्ताकदिनी बनले मोठे शुभ योग; 3 राशींना होणार याचा मोठा लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
'पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात! 'छत्रपती संभाजीनगरमध्ये अलिशान गाडीतील धनाढ्याची मुजोरी
'पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात! 'छत्रपती संभाजीनगरमध्ये अलिशान गाडीतील धनाढ्याची मुजोरी
Embed widget