एक्स्प्लोर
पर्रिकरांशी जवळचा स्नेह, आठवणी जागवताना सुमित्रा महाजन गहिवरल्या
मनोहर पर्रिकर हे खूप जवळचे होते. वर्षानुवर्षे आम्ही एकत्र काम केलं, असं सांगताना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा कंठ दाटून आला. पर्रिकरांच्या मुलांचं सांत्वन करण्यासाठी त्या गोव्याला आल्या होत्या.
पणजी : लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज भाजपचे दिवंगत नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. पर्रिकरांच्या आठवणी जागवताना महाजन गहिवरुन गेल्या.
पर्रिकर यांच्या कुटुंबीयांना भेटून आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांचा कंठ दाटून आला. पर्रिकरांच्या निधनादिवशी येता न आल्यामुळे आज त्यांच्या मुलांची भेट घेतली, असं सुमित्रा महाजन यांनी सांगितलं.
मनोहर पर्रिकर हे खूप जवळचे होते. वर्षानुवर्षे आम्ही एकत्र काम केलं, असं सांगताना महाजन यांचा कंठ दाटून आला. त्यांनी स्वतःला सावरत पर्रिकर यांच्या मुलांची भेट घेतल्याचं सांगितलं.
सुमित्रा महाजन यांनी शुक्रवारी दुपारी मनोहर पर्रिकर यांच्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानाला भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं. जवळपास पाऊण तास महाजन पर्रिकर यांच्या कुटुंबीयांसोबत होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement