Loksabha Election 2024 : भारतीय जनता पक्ष (BJP) 40 पक्षांसह आणि 27 पक्षांसह काँग्रेस लोकसभेच्या (Loksabha Election) निकराच्या लढाईत गुंतले आहेत. परंतु 8 राज्यातील 8 छोटे पक्ष या मोठ्या पक्षांचा खेळ खराब करू शकतात. आठ पक्षांनी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात आघाडी उघडली आहे. हे पक्ष उत्कृष्ट कामगिरी करण्यात यशस्वी ठरल्यास काँग्रेस (Congress) आणि भाजपचा (BJP) खेळ बिघडू शकतो, असे बोलले जात आहे.


एनडीए (NDA)-इंडिया (INDIA alliance) या दोन्ही आघाडीलाही याची भीती वाटते, त्यामुळे या पक्षांचे वर्चस्व असलेल्या भागात भाजप आणि काँग्रेस स्वतंत्र रणनीती तयार करत आहेत. या पक्षांची व्होट बँक लक्षात घेऊन उमेदवारांची निवड केली जात आहे, जेणेकरून कमीत कमी नुकसान होईल. प्रचारातही बडे नेते या पक्षांवर थेट प्रहार करत नाहीत. आकड्यांचा विचार करता, या पक्षांची मतांची टक्केवारी देशभरात सुमारे 15 टक्के असू शकते, परंतु लोकसभेच्या सुमारे 230 जागा अशा आहेत जिथे त्यांचे वर्चस्व खूप जास्त आहे आणि ते निवडणूक तिरंगी करण्यास सज्ज आहेत. 


दक्षिण ते उत्तरपर्यंत; या प्रादेशिक पक्षांची सत्ता


1. AIADMK


अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) हा तामिळनाडूचा प्रादेशिक पक्ष आहे. सध्या पक्ष तामिळनाडू विधानसभेत प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. या पक्षाचा तामिळनाडूतील 39 आणि पुद्दुचेरीतील एका जागेवर थेट प्रभाव आहे. गेल्या निवडणुकीत AIADMK भाजपसोबत होता, पण द्रविड मुद्द्यावरून NDA सोडला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी AIADMK NDA मध्ये परतणार असल्याचीही चर्चा होती, पण पक्षाने एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूमध्ये एका बाजूला भाजप, पीएमके या पक्षांची युती आहे, तर दुसरीकडे द्रमुक आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. मात्र, या दोघांमध्ये कोणाला धार मिळणार हे अण्णाद्रमुकच्या कामगिरीवर अवलंबून राहणार असल्याचे बोलले जात आहे.


2. YSR काँग्रेस


आंध्र प्रदेशचा सत्ताधारी पक्ष YSR काँग्रेसही या निवडणुकीत एकटाच लढत आहे. लोकसभेसोबतच आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकाही प्रस्तावित आहेत. आंध्रमध्ये लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत वायएसआरने एकतर्फी विजय मिळवला होता. मात्र, यावेळी पक्षाचा मार्ग सोपा नाही. एका बाजूला भाजप आणि टीडीपीची युती आहे, तर दुसरीकडे काँग्रेसही जोरदार लढत आहे. आंध्रचा निकाल काय लागेल हे वायएसआरच्या कामगिरीवरही बरेच अवलंबून असेल.


3. वंचित बहुजन आघाडी


प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी पक्ष चालवतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांच्या पक्षाला 6.92 टक्के मते मिळाली होती. महाविकास आघाडी येण्याच्या शक्यता असतानाच त्यांनी एकट्याने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकरांचा कोणतीही ठोस भूमिका आणि जागांची मागणी केली नसल्याने महाविकास आघाडी हैराण होऊन गेली. राज्यात सुमारे 12 जागांवर बहुजन आघाडीचा थेट प्रभाव आहे. गेल्या निवडणुकीत अकोला मतदारसंघावर प्रकाश आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर होते. आंबेडकर हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असून महायुतीचा खेळ बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.


4. बहुजन समाज पार्टी


उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील 84 लोकसभा जागांवर मायावतींचा बहुजन समाज पक्ष मजबूत स्थितीत आहे. मायावती यांनी 2019 मध्ये सपासोबत युती करून निवडणूक लढवली होती, मात्र यावेळी पक्ष एकटाच लढत आहे. 2014 मध्येही बसपने एकट्याने निवडणूक लढवली होती आणि जवळपास 70 जागांवर सपाचा खेळ खराब केला होता. यावेळी सपा काँग्रेससोबत युती करत असली तरी पश्चिम उत्तर प्रदेश आणि बुंदेलखंडच्या जागांवर बसपाची भीती अजूनही सतावत आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-चंबळमध्येही बसपा मजबूत स्थितीत आहे. बसपाने येथे चांगली कामगिरी केल्यास काँग्रेसच्या अडचणी वाढू शकतात.


5. बीआरएस 


तेलंगणातील प्रमुख विरोधी पक्ष बीआरएस यावेळी एकट्याने निवडणूक लढवत आहे. तेलंगणामध्ये लोकसभेच्या एकूण 17 जागा आहेत, त्यापैकी बीआरएसने गेल्या वेळी 9 जागा जिंकल्या होत्या. तेलंगणात भाजप आणि काँग्रेस 2019 च्या तुलनेत मजबूत झाले आहेत, परंतु BRS अनेक जागांवर खेळ खराब करू शकतात. नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएसला 37 टक्के मते मिळाली, जी सत्ताधारी काँग्रेसपेक्षा केवळ 2 टक्के कमी होती. तेलंगणातील शहरी भागात अजूनही केसीआर यांच्या पक्षाचे वर्चस्व आहे.


6. तृणमूल काँग्रेस


पश्चिम बंगालचा सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसही यावेळी एकटाच रिंगणात आहे. बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. याआधी ममतांची सीपीएम आणि काँग्रेससोबत युती होणार असल्याची चर्चा होती, पण शेवटी ममतांनी एकट्यानेच आघाडी करण्याचा मार्ग स्वीकारला. ममता यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांविरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ममता यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन यांच्या विरोधात क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना उभे केले आहे, तर त्यांनी तरुण चेहरा देबांगशु भट्टाचार्य यांना भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तमलूकमधून उमेदवारी दिली आहे. 2019 मध्ये बंगालमध्ये भाजपने 18, काँग्रेसला 2 आणि ममतांच्या पक्षाने 22 जागा जिंकल्या.


7. आयएनएलडी आणि जेजेपी


हरियाणात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस आघाडीमध्ये असली तरी सर्वांच्या नजरा आयएनएलडी आणि जेजेपीसारख्या प्रादेशिक पक्षांवर आहेत. यावेळी दोन्ही पक्ष एकटेच निवडणूक लढवत आहेत. जाट मतांमध्ये दोघांची मजबूत पकड आहे. अलीकडेपर्यंत एनडीए आघाडीत जेजेपीचा समावेश होता. हरियाणात लोकसभेच्या एकूण 10 जागा आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या