Weather Updates: देशातील तापमानात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं उन्हाचा कडाका तर कुठं पाऊस तर कुठं बर्फवृष्टी होत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, ओडिशाच्या काही भागांमध्ये मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तर बिहारमध्येही 7 आणि 8 एप्रिलला पावसाची शक्यता आहे. तर 7 एप्रिलला मध्य प्रदेशात पावसाची शक्यता आहे. 


या भागात उष्णतेची लाट 


ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगाल, झारखंड, विदर्भ, उत्तर अंतर्गत कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, रायलसीमा आणि तेलंगणाच्या वेगळ्या भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांनी कडक उन्हाच्या वेळी बाहेर निगू नये. या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


अरुणाचल प्रदेशात बर्फवृष्टी होण्याची शक्यता 


दरम्यान, अरुणाचल प्रदेशात बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर अमृतसर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बंगालसह छत्तीसगडमध्ये उष्ण वारे वाहू शकते. विदर्भातही दमट वारे वाहू शकते.  तर दुसरीकडे जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही निवडक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता नाही. 


 गोव्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 8 ते 10 एप्रिल दरम्यान गोव्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळी धुके पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. 


महाराष्ट्रात कसं असेल हवामान?


महाराष्ट्रात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. 38 ते 40 अंशाच्या आसपास तापमानाचा पारा गेला आहे. तर काही ठिकाणी 41 ते 42 अंशावर तापमान गेलं आहे. त्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. दरम्यान, उद्यापासून गुढीपाडव्यापर्यंत म्हणजे 9 तारखेपर्यंत राज्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे.  


महत्वाच्या बातम्या:


Weather Update : राज्यात उष्णतेची लाट असतानाच चार दिवस 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा!