Loksabha Election 2024 : आजचा (25 सप्टेंबर) रविवार हा राजकीय घडामोडींचा असणार आहे. कारण आजच्या दिवसात वेगवेगळ्या घडामोडी घडणार आहेत. यामध्ये सर्वांत महत्त्वाची घडामोड म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहेत. त्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज हरियाणामध्ये भाजप विरोधातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. हरियाणातील फतेहाबादमध्ये आज 17 विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. भाजपविरोधी पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
विरोधी पक्षातील 25 बडे नेते उपस्थित राहणार, काँग्रेस, आपला आमंत्रण नाही
आज माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. हरियाणाच्या फतेहाबादमध्ये इंडियन नॅशनल लोक दलाने (INLD) विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले आहेत. इतकेच नाही तर इंडियन नॅशनल लोकदल काँग्रेसपासून वेगळी तिसरी आघाडी बनवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आयएनएलडीने विरोधी पक्षातील 25 मोठ्या नेत्यांना रॅलीसाठी आमंत्रित केले आहे. त्यात 12 असे पक्ष आहेत जे एकेकाळी एनडीएचा भाग होते. विरोधकांच्या या व्यासपीठाकडे भाजप आणि काँग्रेस विरोधी म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळेच भारतीय राष्ट्रीय लोकदलाने काँग्रेस, सीपीआय, आम आदमी पार्टी आणि बसपा यांना आमंत्रण पाठवले नाही.
हरियाणात कोण-कोणते नेते उपस्थित राहणार
हरियाणात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला अनेक नेते उपस्थिती लावणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, द्रमुकच्या खासदार कनिमोझी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, टीएमसीचे सुखेंदू शेखर रॉय, शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत आणि सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादवही विरोधकांच्या ताकदीच्या प्रदर्शनात सहभागी होणार असल्याचा दावा केला जात आहे.
नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव घेणार सोनिया गांधी यांची भेट
भाजप आणि काँग्रेसशिवाय फतेहाबादमध्ये तिसर्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू असतानाच दुसरीकडे आज नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव हे सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात 2024 च्या रणनीतीवर चर्चा करण्याच येणार आहे. दोन्ही नेते भाजपला घेरण्यासाठी सर्व मार्ग शोधत असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: