Defence Expo 2022 : भारतात आशियातील सर्वात मोठा डिफेन्स एक्स्पो (Defence Expo 2022) होणार आहे. पुढील महिन्यात गुजरातमध्ये संरक्षण प्रदर्शन (DefExpo 2022) होणार आहे. गुजरातमध्ये 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान गुजरातची राजधानी गांधीनगर येथे डिफेन्स एक्सो पार पडणार आहे. आशियातील सर्वात मोठ्या डिफेन्स एक्स्पोमध्ये यावेळी अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. यंदा डिफोन्स एक्स्पोमध्ये केवळ स्वदेशी अर्थात भारतीय कंपन्या सहभागी होणार आहेत. डिफेन्स एक्स्पोमध्ये फक्त भारतीय कंपन्या सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वदेशी कंपन्यांव्यतिरिक्त, त्याचं विदेशी ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स असलेल्या (OEM) कंपन्या यामध्ये सहभागी होऊ शकतात. ज्या विदेशा कंपन्यांचा भारतीय कंपनीसोबत संयुक्त प्रकल्प आहे किंवा त्यांची उपकंपनी कंपनी भारतात आहे, अशा कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होऊ शकतील.


ऑक्टोबरमध्ये होणार डिफेन्स एक्स्पो 2022


संरक्षण सचिव अजय कुमार यांनी शनिवारी देशात होणाऱ्या 'डेफ-एक्स्पो 2022' (DefExpo 2022) च्या तयारीचा आढावा घेतला. यासाठी एक बैठक पार पडली. संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुजरातचे मुख्य सचिव पंकज कुमारही या बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीनंतर संरक्षण मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी केलं. हे डिफेन्स एक्स्पोचं बारावं वर्ष आहे. हे प्रदर्शन केवळ भारतीय कंपन्यांसाठीचे पहिले प्रदर्शन आहे.


आतापर्यंत 1000 हून अधिक कंपन्यांची नोंदणी


आतापर्यंत संरक्षण प्रदर्शनासाठी म्हणजेड डिफेन्स एक्सो 2022 या कार्यक्रमासाठी 1,000 हून अधिक कंपन्यांनी नोंदणी केली असून नोंदणी अद्याप सुरू आहे. यंदाचा हा डिफेन्स-एक्स्पो आतापर्यंतचा सर्वात मोठा एक्स्पो ठरणार आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी शनिवारी झालेल्या बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना स्वदेशी संरक्षण प्लॅटफॉर्म आणि उत्पादनांच्या व्यापार आणि निर्यात प्रोत्साहनावर लक्ष केंद्रित करून, DefExpo 2022 यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केलं आहे.


'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' एक्स्पोची थीम


दोन वर्षांतून एकदा देशात आयोजित होणाऱ्या संरक्षण प्रदर्शनाची यंदाची थीम 'पाथ टू प्राइड' (Path to Pride) आहे आणि भारतीयांसाठी भारतीय आणि जागतिक ग्राहकांना समर्थन, प्रदर्शन आणि भागीदारी करून एकत्र आणण्याचा उद्देश आहे. भारताला एक मजबूत आणि स्वावलंबी देश बनवण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेशी संबंधित आहे. प्रदर्शनाचा मुख्य उद्देश देशांतर्गत संरक्षण उद्योगाची ताकद दाखवणे आणि 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड'चा संकल्प दृढ करणे हा आहे.