Mann ki Baat LIVE: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशाला संबोधित करणार आहेत. मन की बातच्या माध्यमातून ते संवाद साधतील. सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रम होणार आहे. आजच्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या रविवारी केलेल्या मन की बात मध्ये पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे रंग केवळ भारतातच नाही तर जगभरात कौतुक झालं असल्याचं सांगितलं होतं. तसंच  येणारं वर्ष बाजरी वर्ष असल्याचं सांगत शेतकऱ्यांना तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करा असं आवाहनही केलं होतं.


'मन की बात' या कार्यक्रमाचा आजचा 93वा भाग


दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणी आणि डीडी चॅनलवर प्रसारित केल्या जाणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा आजचा 93वा भाग आहे. प्रसार भारती आपल्या आकाशवाणी नेटवर्कवर हा कार्यक्रम 23 भाषांमध्ये प्रसारित करते. याव्यतिरिक्त प्रसार भारती आपल्या विविध डीडी चॅनल्सवर या कार्यक्रमाच्या व्हिज्युअल आवृत्त्या हिंदी आणि इतर भाषांमध्येही प्रसारित केल्या जातात.






मन की बात कार्यक्रमासाठी लोकांकडून सूचना मागवल्या 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या या भागासाठी लोकांकडून सूचना मागवल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी लोकांना आवाहन केले होते की, नागरिक या कार्यक्रमासाठी आवश्यक सूचना शेअर करू शकतात. पीएम मोदी हे त्यांच्या मन की बात या विशेष कार्यक्रमात जनतेकडून आलेल्या निवडक सूचना आणि कल्पनांचा समावेश करत असतात, तसंच त्यांचं कौतुकही करत असतात.  


2014 पासून सतत करत आहेत 'मन की बात'


पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 90वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात.  


इतर महत्वाच्या बातम्या


Mann Ki Baat Highlights: सरोवर, तृणधान्य, सण ते डिजिटल इंडिया; पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मधील महत्वाचे मुद्दे


PM Modi : येणारं वर्ष बाजरी वर्ष! पंतप्रधान म्हणाले, शेतकऱ्यांनो तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करा