एक्स्प्लोर

Lokniti- CSDS Exit Poll : लोकनीती-सीएसडीएसचा एक्झिट पोल जाहीर; काँग्रेसला धक्का, आप आणि भाजपला सत्ता

Lokniti- CSDS Exit Poll : लोकनीती-सीएसडीएसने एक्झिट पोल जाहीर केला आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपला फायदा होणार आहे.

Lokniti- CSDS Exit Poll :  पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना लोकनीती-सीएसडीएसने आपला एक्झिट पोल जाहीर केला  आहे. लोकनीती-सीएसडीएसने आपल्या एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याची आकडेवारी न देता मतांच्या टक्केवारांचा अंदाज वर्तवला आहे. 

लोकनीती-सीएसडीएसच्या एक्झिट पोलनुसार, पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का बसणार आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष दमदार कामगिरी करणार आहे. आम आदमी पक्षाला 40 टक्के मते मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काँग्रेसच्या मतात घट होणार असून 26 टक्के मते मिळणार आहेत. शिरोमणी अकाली दलाला 20 टक्के, भाजप आघाडीला 7 टक्के मते मिळणार असल्याचे लोकनीति-सीएसडीएसने म्हटले आहे. 


उत्तराखंडमध्ये भाजपकडे सत्ता कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला 43 टक्के, काँग्रेसला 38 टक्के, आम आदमी पक्षाला 3 टक्के मते मिळणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. 

गोव्यामध्ये त्रिशंकू विधानसभा निर्माण होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच असणार आहे. भाजपला 32 टक्के, काँग्रेसला 29 टक्के आणि तृणमूल काँग्रेसला 14 टक्के मते मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आम आदमी पक्षाला 7 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. 


संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला 43 टक्के मते मिळतील. समाजवादी पक्षाला 35 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. बहुजन समाज पक्षाला 15 टक्के आणि काँग्रेसला 3 टक्के मते मिळण्याची शक्यता असल्याचे लोकनीति-सीएसडीएसने एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. 


याआधी सी-व्होटर व इतर संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजप बाजी मारणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा घटणार असल्या तरी त्यांना सत्ता स्थापन करता येईल. 

महत्त्वाच्या बातम्या

Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
Jitendra Awhad : डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा म्हणजे देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच, नताशा आव्हाड यांची पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
नताशा आव्हाड यांची डिलिमिटेशन विरोधात पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Amit Shah : अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये पुण्यात महत्त्वाची बैठक, राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा,बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Embed widget