नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेवर झेंडा कोण फडकावणार, याचा निर्णय 15 मे रोजी होणार आहे. मात्र त्यापूर्वी लोकनीती-सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने मोठा सर्व्हे केला आहे, ज्यामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या कामकाजावर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.


कोणत्या पक्षाला किती जागा?

काँग्रेस : 92 ते 102 जागा

भाजप : 79 ते 89 जागा

जेडीएस : 32 ते 42 जागा

इतर : एक ते सात जागा

कोणत्या पक्षाला किती टक्के मतं?

काँग्रेस : 38 टक्के

भाजप : 33 टक्के

जेडीएस+ : 22 टक्के

मोदी सरकारचं कामकाज कसं आहे?

खुप चांगलं : 23 टक्के

चांगलं : 45 टक्के

वाईट : 16 टक्के

अत्यंत वाईट : 12 टक्के

कर्नाटकातील सिद्धरमैय्या सरकारचं काम कसं आहे?

खुप चांगलं : 29 टक्के

चांगलं : 43 टक्के

वाईट : 15 टक्के

अत्यंत वाईट : 10 टक्के

सर्वात भ्रष्ट पक्ष कोणता?

काँग्रेस : 41 टक्के

भाजप : 44 टक्के

जेडीएस : 4 टक्के

लिंगायत समाजाची मतं कुणाला?

काँग्रेस : 18 टक्के

भाजप : 61 टक्के

जेडीएस : 11 टक्के

सर्व्हे कसा झाला?

कर्नाटकात 12 मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी एबीपी न्यूजने लोकनीती-सीएसडीएस सोबत मिळून कर्नाटकातील जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 27 एप्रिल ते 3 मे दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. 56 विधानसभा मतदारसंघांमधील 244 बूथवर जाऊन 4 हजार 929 मतदारांचं मत जाणून घेण्यात आलं.